
OpenAI च्या Sora ला टक्कर देणार Google चे Veo 2! हाय क्वालिटी व्हिडीओंसाठी कोण ठरणार अव्वल?
काही दिवसांपूर्वी टेक कंपनी आणि ChatGPT मेकर OpenAI ने लेटेस्ट AI टूल Sora Turbo लाँच केलं. हे टूल टेक्सला व्हिडीओमध्ये जनरेट करू शकते. हे AI टूल सध्या ChatGPT च्या पेड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. OpenAI च्या टूलला आता टेक जायंट कंपनी गुगल टक्कर देणार आहे. कारण गुगलने नवीन AI टूल्स लाँच केले आहेत, जे हाय क्वालिटी व्हिडीओंसाठी मदत करणार आहे.
गुगलने लाँच केलेल्या या टूल्समध्ये Veo 2, Imagen 3 आणि Whisk AI या मॉडेल्सचा समावेश आहे. गुगलने या तिन्ही मॉडेल्सचे व्हिडीओ त्यांच्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केले आहेत. आता OpenAI चे Sora Turbo की Google चे Veo 2 कोण वरचढ ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (फोटो सौजन्य – गुगल)
Realme 14x 5G: काही क्षणातचं लाँच होणार Realme चा नवीन स्मार्टफोन, बजेट किंमतीत मिळणार अनोखे फीचर्स
OpenAI च्या Sora Turbo सोबत स्पर्धा करण्यासाठी Google ने नवीन आणि सुधारित Veo 2 व्हिडिओ जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. Veo AI मॉडेल रियलिस्टिक मोशन आणि 4K पर्यंत हाय क्वालिटी आउटपुट तयार करू शकतात. जे AI व्हिडिओ जनरेटर प्लॅटफॉर्मपेक्षा चांगले आहे. यासह, Google ने एक नवीन Imagen 3 वर्जन आणि एकाधिक व्हिज्युअलमधून एकच प्रतिमा तयार करण्यासाठी नवीन Whisk मॉडेल देखील लाँच केले आहे.
Google ने Veo 2, Imagen 3 आणि Whisk AI मॉडेल लाँच केले आहेत. Google ने Veo 2 वापरून बनवलेल्या छोट्या व्हिडिओ क्लिपची सीरीज शेअर केली आहे, जी प्लॅटफॉर्म प्राणी आणि अन्नाचे हायपर-रियलिस्टिक व्हिडिओ तयार करू शकते. यामध्ये तुम्ही 8 सेकंदाच्या मानवी ॲनिमेटेड क्लिप देखील पाहू शकता.
गुगलच्या मते, Veo 2 लोकप्रिय व्हिडिओ जनरेशनल प्लॅटफॉर्मपेक्षा चांगली कामगिरी करू शकते. मात्र, कंपनीने आपल्या स्पर्धकांची नावे घेतलेली नाहीत. पण ते ओपनएआयच्या सोराला तगडी स्पर्धा देऊ शकते. यामुळे आता OpenAI त्यांच्या AI टूल्समध्ये काही सुधारणा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कंपनीचे नवीन Whisk एआय मॉडेल हा गुगल लॅबचा नवा प्रयोग आहे. हे तुम्हाला शब्दांऐवजी फोटो प्रॉम्प्ट स्वीकारण्यास प्रवृत्त करते. याचा अर्थ तुम्ही प्रॉम्प्ट म्हणून एकाच वेळी अनेक फोटो देऊ शकता. हे सर्व फोटो एकत्र करून नवीन अमेजन जेनरेट करेल. तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी 3 ते 4 बॉक्स मिळतात, ज्यामध्ये सब्जेक्ट, सीन आणि स्टाइल समाविष्ट असते.
Blinkit Secret Santa: Blinkit सुद्धा खेळतोय Secret Santa, अशा प्रकारे घ्या सहभाग!
तुम्ही तुमचा कोणताही फोटो सब्जेक्ट बॉक्समध्ये अपलोड करा, सीन टूलमध्ये माउंटन व्ह्यू आणि स्टाइल बॉक्समध्ये ॲनिमेटेड फोटो टाका. हे सर्व फोटो अपलोड केल्यानंतर व्हिस्क तुम्हाला नवीन फोटो तयार करण्यात मदत करते.