Blinkit Secret Santa: Blinkit सुद्धा खेळतोय Secret Santa, अशा प्रकारे घ्या सहभाग!
25 डिसेंबर रोजी देशभरात ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमसबरोबर सणासुदीचा हंगाम आणि शाळांना सुट्ट्या सुरू होतात. विशेषत: मुलांना ख्रिसमस सर्वात जास्त आवडतो. कारण या दिवशी ते सांताकडून भेटवस्तूंची प्रतीक्षा करतात. ख्रिसमस अगदी काही दिवसांवर आला आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये ख्रिसमसची तयारी सुरु झाली आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये सर्वचजण ख्रिसमससाठी उत्साही आहेत. काहींनी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जायचं, याचं प्लॅनिंग देखील केलं आहे.
Year Ender 2024: हे आहेत यावर्षीचे ‘Alexa’ ला विचारण्यात आलेले मजेदार प्रश्न, वाचून हसू आवरणार नाही
ऑफीसमध्ये देखील ख्रिसमसची तयारी सुरु झाली आहे. ख्रिसमसमधील सर्वांचं आवडता गेम म्हणजे सिक्रेट सांता. ऑफीससह शाळांमध्ये देखील हा गेम उत्साहाने खेळला जातो. आता ब्लिंकिट देखील या खेळात सहभागी होणार आहे.सर्वांचा आवडता हा सण अधिक मजेदार बनवण्यासाठी झोमॅटोच्या कंपनी ब्लिंकिटने एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्याचे नाव आहे सिक्रेट सांता फीचर. या फीचरमुळे यूजर्स त्यांच्या मित्रांना डिजीटल पद्धतीने गिफ्ट देऊ शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला ख्रिसमसचं गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्हाला मॉल किंवा मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. या नवीन फीचरबाबत ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना ब्लिंकिटवर एक सिक्रेट सांता गट तयार करण्यास, एक सिक्रेट सांता निवडण्याची आणि भेटवस्तू ऑर्डर करण्याची परवानगी देते, हे सर्व काही मिनिटांत होणार आहे.
Introducing Secret Santa by Blinkit!
It’s a new feature we’ve built that allows one to:
🎄Create a Secret Santa group on Blinkit
🎅 Invite friends & assign/ match Santas
📅 Set a time and place for the gift exchange (with timely reminders)
🎁 Order gifts and get them delivered… pic.twitter.com/skuCsBpbWD— Albinder Dhindsa (@albinder) December 17, 2024
ब्लिंकिटचे हे नवीन फीचर कसे काम करेल हे तुम्हाला अजूनही समजत नसेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ शकता आणि या फीचरद्वारे कोणालाही गिफ्ट पाठवू शकता. विशेष बाब म्हणजे हे फीचर गिफ्ट पाठवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवते.
बऱ्याच लोकांना हे वैशिष्ट्य खूप आवडले आहे. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांच्या पोस्टवर युजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत. कमेंट करताना, एका वापरकर्त्याने लिहिले की या वैशिष्ट्यामुळे जगभरातील एचआर विभागांच्या कामाचा मोठा भाग कमी झाला आहे.