कितीही पाऊस असू द्या पण तुमची कार आणि बाईक डुबणार नाही, Google Map ने आणले 2 नवीन फीचर्स
सध्याच्या वातावरणात कधी पाऊस पडेल आणि कधी ऊन पडेल आपण काही सांगू शकत नाही. या काळात गुगल मॅप देखील मदत करू शकत नाहीत, कारण गुगल मॅपवर पावसाचे कोणतेही अपडेट आतापर्यंत मिळत नव्हते. पण आता असं होणार नाही. आता गुगल मॅपने नवीन अपडेट लाँच केले आहेत. या अपडेटनुसार, आता रिअल टाईम हवामान अपडेट्स गुगल मॅपवर दिले जाणार आहेत. या नवीन अपडेटमुळे तुमचा कार आणि बाईकचा प्रवास अधिक सुखाचा होणार आहे. आता कितीही पाऊस असु द्या पण गुगल मॅप याची तुम्हाला आधीच माहिती देईल. ज्यामुळे तुमची कार आणि बाईक पावसात डुबणार नाही.
हेदेखील वाचा- फेक रिव्ह्यूपासून युजर्सची होणार सुटका, Google Maps ने लाँच केल नवं फीचर
याशिवाय आता गुगल मॅप तुम्हाला शॉपिंगमध्ये देखील मदत करणार आहे. तुम्ही खरेदीसाठी जाणार असाल तर तुमच्या आजूबाजूची दुकाने शोधण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करणार आहे. गुगल मॅपची हे दोन्ही फीचर्स युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत. गुगल मॅपच्या फीचर्सच्या मदतीने युजर्सची अनेक कामं अगदी सहज होऊ शकतील. एखाद्या मार्गावर बांधकाम सुरू असल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास गुगल मॅप तुम्हाला माहिती देणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपने लाँच केलेलं रिअल टाईम फीचर तुम्हाला खराब रस्त्यांबद्दल माहिती देणार आहे. याशिवाय अरुंद रस्त्यांची माहिती देखील गुगल मॅपद्वारे दिली जाणार आहे. तसेच कार आणि बाईक युजर्सना पावसात बाहेर पडण्यापूर्वी खराब रस्ते आणि हवामानाची माहिती मिळणार आहे. गुगल मॅप धुक्यामुळे कमी दृश्यमानता असलेल्या मार्गांची माहिती देईल, जेणेकरून तुम्ही योग्य मार्ग निवडून कोणत्याही प्रकारची समस्या टाळू शकता. शिवाय कोणत्या भागात किंवा कोणत्या रस्त्यावर पाणी भरलं आहे, याची गुगल तुम्हाला माहिती देणार आहे.
तुम्ही धुके असलेल्या भागात गाडी चालवत असाल किंवा मुसळधार पाऊस पडत असल्यास गुगल मॅप तुम्हाला कळवेल. तुम्ही या सूचना पाहू शकता आणि इतरांनाही सांगू शकता. याद्वारे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणे टाळून दुसरा मार्ग निवडू शकता.
हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या
आता तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने शॉपिंग शॉपचे लोकेशन देखील शोधू शकता. ज्या ठिकाणाहून वस्तू खरेदी करता येईल असे सर्वाेत्तम दुकान देखील गुगल मॅप तुम्हाला दाखवणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी क्रिकेटची बॅट आणि बॉलची डिझाईन असलेला केक खरेदी करायचा असेल, तर अशी रचना करणारे चांगले केक शॉप कुठे मिळेल. यासंदर्भातील लोकेशन तपशील फोटोसह गुगल मॅपवर दिला जाईल. नवीन फीचर तुम्हाला रेस्टॉरंटबद्दल लोकांच्या मतांची समरी देईल. जर तुम्हाला एखादे चांगले रेस्टॉरंट शोधायचे असेल तर गुगल मॅप तुम्हाला मदत करणार आहे. हे काम Google च्या जेमिनी मॉडेलद्वारे केले जाईल, जे गुगल मॅपवर उपस्थित असलेल्या लाखो रिव्ह्युचे विश्लेषण करेल.