फोटो सौजन्य - pinterest
डिजिटल मॅपिंग आणि नेव्हिगेशन ॲप Google Map ने त्यांच्या भारतातील नियमात बदल केले आहेत. Google Map चे हे नवीन नियम 1 ऑगस्ट पासून देशभरात लागू होणार आहे. आतापर्यंत Google Map चा वापर करताना अमेरिकन चलन असलेल्या डॉलरमध्ये पैसे मोजावे लागत होते. पण आता हा नियम बदलला आहे. आता Google Map चा वापर करताना अमेरिकन डॉलरमध्ये नाही तर भारतीय चलन असलेल्या रुपयांमध्ये पैसे मोजावे लागणार आहेत. यासोबतच Google Map कंपनीने भारतात शुल्क देखील 70 टक्क्यांनी कमी केले आहे. कंपनीचे हे नवीन नियम 1 ऑगस्ट पासून देशभरात लागू होणार आहे.
हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या
Google Map चे हे नियम केवळ व्यावसायिकांसाठी आहेत. त्यामुळे सर्वसाान्यांना Google Map चा वापर करताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. जे व्यावसायिक त्यांच्या कामासाठी Google Map चा वापर करतात अशा व्यावसायिकांसाठी हे नियम आहेत. सामान्य वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. वास्तविक, Google Map सर्वसामान्यांना मोफत सेवा देतो. पण जी कंपनी आपल्या व्यवसायात Google Map चा वापर करते, अशा कंपन्यांना सेवेच्या बदल्यात Google Map वर शुल्क भरावे लागते. गुगल मॅपने यामध्ये बदल करून शुल्क कमी केले आहे.
यापूर्वी भारतात Google Map नेव्हिगेशन सेवा देण्यासाठी 4 ते 5 डॉलर मासिक शुल्क आकारत होते. मात्र नियमांमध्ये बदल केल्यानंतर हे शुल्क 1.50 डॉलर (125 रुपये) करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ओला मॅप्सबाबत घोषणा केली. OLA आता नेव्हिगेशनसाठी Google Map ची मदत घेणार नाही. कंपनीने स्वत:च्या नकाशा प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली. OLA ने स्वतःचे डिजिटल मॅपिंग आणि नेव्हिगेशन ॲप Ola Maps काही दिवसांपूर्वी लाँच केलं आहे. Ola Maps च्या लॉन्चिंग नंतर Google Map ने नवीन नियमांची घोषणा केली आहे. कंपनीचे हे नवीन नियम 1 ऑगस्ट पासून देशभरात लागू होणार आहे.
हेदेखील वाचा- OLA आता लवकरच किराणा डिलिव्हरी करणार! OLA कॅब्ससाठी कंपनीचं Ola Maps सुध्दा लाँच
OLA ने स्वतःचे डिजिटल मॅपिंग आणि नेव्हिगेशन ॲप Ola Maps काही दिवसांपूर्वी लाँच केलं आहे. Ola च्या AI कंपनी Krutrim ने नुकतीच “Made for India” आणि “Prised for India” नावाची योजना सुरु केली आहे. यामध्ये ओला मॅप्ससाठी नवीन रोडमॅप आणि किंमत धोरण तयार करण्यात आलं आहे. ही योजना थेट Google maps सोबत स्पर्धा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी Google maps च्या नविन नियमांवर टीका केली आहे. भाविश अग्रवाल यांनी पोस्ट केलं आहे की, ‘गुगलने बदल करण्यात खूप विलंब केला आहे. किंमत कमी, भारतीय रुपयात पेमेंट… हा तुमचा खोटा शो आहे, ज्याची गरज नाही.