Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा (फोटो सौजन्य-pinterest)
प्रत्येकजण आपले फोटो सेव्ह करण्यासाठी गुगल फोटोचा वापर करतो. कारण गुगल फोटोमध्ये सेव्ह केलेले फोटो आपण अगदी सहज शोधू शकतो. गुगल फोटोमध्ये आपण आपल्या जुन्या आठवणी पाहू शकतो. पण काही लोकांना याच आठवणींचा त्रास होतो. Google Photos मध्ये Memories नावाचे एक खास वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य विशिष्ट व्यक्तीच्या फोटोंच्या आठवणी दर्शवते. पण आता कंपनी या Memories मध्ये एक नवीन फीचर लाँच करत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमधून नको असलेल्या व्यक्ति जशी की तुमची एक्स यांच्या आठवणी कायमच्या ब्लॉक करू शकाल.
हेदेखील वाचा- स्मार्टफोनमध्ये फोटो एडीट करणं झालं अधिक सोपं! Google ने लाँच केलं AI editing टूल
Google Photos वर एका नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. हे फीचर लवकरच लाँच देखील केलं जाणार आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर तुम्ही इतर अॅप्सप्रमाणे Google Photos मधून देखील तुमच्या एक्सला ब्लॉक करण्यास सक्षम असाल. Google Photos च्या Memories मध्ये येणाऱ्या नवीन फीचरच्या मदतीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीला ब्लॉक केले जाऊ शकते, त्यानंतर त्या व्यक्तीसोबतच्या तुमच्या आठवणी Google Photos मध्ये दिसणार नाहीत.
ज्यांना एखाद्या व्यक्तीशी संबंधित फोटो ठेवायचे आहेत पण त्याला पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचे नाही त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या या फीचरची अँड्रॉइड ॲपवर चाचणी केली जात आहे, मात्र नंतर ते iOS साठी देखील सादर केले जाईल. Google Photos मध्ये फोटो सेव करण्याचे अनेक फायदे आहेत.
हेदेखील वाचा- Made by Google इवेंटच्या लाईव्ह दरम्यान Gemini AI प्रश्नांची उत्तरं देण्यात ठरलं अयशस्वी
Google Photos मध्ये सेव केलेले फोटो आपण अगदी 4 ते 5 वर्षांनतर देखील सहज शोधू शकतो. Google Photos मध्ये काही दिवसांपूर्वीच एक नवं फीचर लाँच झालं होतं. ज्याच्या मदतीने युजर्स Google Photos मध्ये त्यांचे फोटो एडीट करू शकतील. यामध्ये Magic Eraser, Photo Unblur आणि Portrait Light यांसारख्या फीचरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल त्या पध्दीतीने तुमचा फोटो एडीट करू शकता. यानंतर आता आणखी एक नवीन फीचर लाँच केलं जात आहे.
गुगल फोटोजच्या या नवीन फीचरची माहिती गुगल सपोर्ट पेजवर देखील देण्यात आली आहे. वास्तविक, नवीन अपडेटनंतर कोणत्याही व्यक्तीचा चेहरा ब्लॉक केला जाऊ शकतो. हे ग्रुप फोटो आणि सिंगल्स फोटो दोन्हीसाठी काम करेल. त्यामुळे आता तुम्हाला सतत तुमच्या एक्सचा चेहरा पाहावा लागणार नाही.