Made by Google 2024 ईव्हेंटमध्ये लाँच होणार Google Pixel 9 Series (फोटो सौजन्य- pinterest)
आजपासून Google च्या Made by Google 2024 ईव्हेंटला सुरुवात होणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी युजर्ससाठी अनेक खास डिव्हाइस लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्या ईव्हेंटमध्ये Google Pixel 9 सिरीज देखील लाँच केली जाण्याची शक्यता आहे. गुगल AI वर खूप भर देत आहे. त्यामुळे ह्या ईव्हेंटमध्ये कोणतं नवीन AI मॉडेल लाँच केलं जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ईव्हेंटमध्ये Google Pixel 9 सिरीज, Google Pixel Watch 3, Google Pixel Buds Pro 2 हे डिव्हाइस लाँच केले जाण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या डिव्हाइसची चर्चा सुरु आहे. युजर्स देखील या नवीन डिव्हाइसबाबत अत्यंत उत्सुक आहेत.
हेदेखील वाचा- यूएस निवडणुकीपूर्वी X वर सुरु असलेल्या Trump यांच्या मुलाखतीत टेक्निकल ग्लिच; Musk चा डीडीओएस अटॅकला दोष
Made by Google 2024 ईव्हेंट दरम्यान Google Pixel 9 सिरीज लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. हे सर्व स्मार्टफोन Google च्या Tensor G4 चिपसेटवर आधारित असतील. तसेच या स्मार्टफोन्समध्ये अनेक AI फीचर्सचा देखील समावेश असू शकतो. Pixel 9 Pro स्मार्टफोन 999 डॉलर म्हणजेच सुमारे 83,867 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर Pixel 9 Pro XL 1,200 डॉलर म्हणजेच सुमारे 1,01,000 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Pixel 9 ची किंमत 900 डॉलर म्हणजेच सुमारे 75,556 रुपये असू शकते. Pixel च्या आगामी फोनच्या या किमती अमेरिकन मार्केटसाठी आहेत. भारतात त्यांची किंमत वेगळी असण्याची शक्यता आहे. साधारणपणे, अमेरिकन आणि भारतीय बाजारपेठेतील Google च्या Pixel फोनच्या किंमतीत सुमारे 23000 रुपयांचा फरक आहे. Pixel 9 Pro स्मार्टफोन बोलायचं झालं तर, हा 6.3-इंचाचा डिस्प्ले, 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज सह ऑफर केला जाऊ शकतो. यासोबतच कंपनी स्पेसिफिकेशन्समध्ये अनेक अपग्रेड्स समाविष्ट करू शकते. हा फोन 48-MP टेलिफोटो लेन्स आणि 42-MP फ्रंट कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival! लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट, खरेदीची संधी चुकवू नका
Google चे नवीन Google Pixel Watch 3 देखील स्मार्टफोनसोबत लाँच होणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Google Pixel Watch 3 एक मोठे XL मॉडेल असेल, ज्याचा डिस्प्ले 41 मिमी आणि 45 मिमी आकाराचा असेल. हे नवीन डिझाइन आणि विशेष वैशिष्ट्यांसह लाँच केले जाईल.
घड्याळ आणि स्मार्टफोनसोबत, Google या इव्हेंटमध्ये Pixel Buds Pro 2 लाँच करू शकते. हे बड्स Pixel Buds Pro चे अपग्रेड आहे. नवीन डिझाईन, मोठे स्पीकर ग्रिल आणि विंग टिप्स यामध्ये मिळू शकतात. यासोबतच नॉइज कॅन्सलेशन आणि स्पेशिअल ऑडिओ प्लेबॅक फीचर्सही उपलब्ध होऊ शकतात.