फोटो सौजन्य - pinterest
सध्या सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांची फसवूणक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बनावट अॅप, बनावट वेबसाईट तर कधी खोटे कॉल आणि मॅसेज. सायबर स्कॅमर नागरिकांची फसवूणक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट केलं जातं. त्यामुळे तुमचे खाते सुरक्षित नसेल तर सायबर फसवणूक होण्याची शक्यता वाढते. पण जर तुम्ही Google सेफ्टी चेक हे फिचर वापरत असाल तर तुम्ही सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहू शकता.
हेदेखील वाचा- CrowdStrike च्या ‘या’ कर्मचाऱ्यामुळे झाला होता जगावर परिणाम? एक अपडेट आणि कामं झाली होती ठप्प
प्रत्येक व्यक्ती आपल्या स्मार्टफोनमध्ये Google वापरतो. Google तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवते. सुरक्षित ब्राउझिंगमुळे Google युजर्सना अनेक सुविधा मिळतात. Google त्याच्या युजर्ससाठी अनेक प्रकारे सुरक्षा प्रदान करण्यात मदत करते. Google चे सेफ्टी चेक फीचर तुम्हाला सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करते. हे फीचर तुम्ही स्मार्टफोन आणि वेब दोन्हीवर सहज वापरू शकता.
हेदेखील वाचा- घरासाठी CCTV कॅमेरा शोधताय; हा CCTV कॅमेरा तुमच्या घरासाठी बेस्ट ठरू शकतो
गुगल प्रमाणेच WhatsApp देखील युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर लाँच करणार आहे. सध्या WhatsApp वर मॅसेज पाठवून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात WhatsApp वर लोकांना मॅसेज पाठवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या फसवणूकीच्या वाढत्या घटना लक्षात घेत WhatsApp ने आता त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. WhatsApp युजर्सना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी लवकरच एक सुरक्षा फीचर लाँत करणार आहे. सध्या या फीचरवर काम केलं जात आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स ॲपमध्येच सुरक्षेचा आढावा घेऊ शकतील. या फीचरचा युजर्सना खूप फायदा होणार आहे.