फोटो सौजन्य - Vincent Flibustier (X)
19 जुलै रोजी जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे लॅपटॉप आणि संगणक अचानक क्रॅश झाले होते. या सर्व लॅपटॉप आणि संगणकमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) समस्या निर्माण झाली होती. मायक्रोसॉफ्ट युजर्सना त्यांच्या लॅपटॉपवर एक निळी स्क्रिन दिसत होती. यामध्ये सांगितलं जात होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रोसेसला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ(बीएसओडी) असं नाव देण्यात आलं. या समस्येचा परिणाम जगभरातील अनेक कामांवर झाला होता. जग थांबल नव्हतं पण अनेक कामं नक्कीच रखडली होती.
हेदेखील वाचा- JIO आणि Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम विमानसेवेवर झाला. जगभरातील सुमारे 6,600 उड्डाणे रद्द करण्यात आली, त्यापैकी 200 भारतातील होती. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याशिवाय शेअर बाजार बंद होता. अनेक शॉपिंग मॉल्स बंद होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. विमानतळांवर हस्तलिखित बोर्डिंग पास दिले जात होते, हॉस्पिटलमध्ये हस्तलिखित स्लिप देण्यात येत होत्या. एवढेच नाही तर याचा परिणाम ब्रिटनमध्ये देखील झाला. सर्व्हरमधील बिघाडामुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. पण हे सर्व नक्की का झालं. हा कोणता सायबर अटॅक होता का?
हा कोणताही सायबर अटॅक नसून केवळ एका व्यक्तिमुळे जभरातील कामं ठप्प झाली होती, अशी सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे. हा व्यक्ती म्हणजे CrowdStrike कंपनीमधील कर्मचारी होता, असा दावा Vincent Flibustier नावाच्या व्यक्तिने केला आहे. Vincent Flibustier त्याच्या X अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, CrowdStrike चा पहिला दिवस, अपडेट पुढे ढकलले आणि दुपारनंतर सुट्टी घेतली.
First day at Crowdstrike, pushed a little update and taking the afternoon off ✌️ pic.twitter.com/bOs4qAKwu0
— Vincent Flibustier 👽 (@vinceflibustier) July 19, 2024
हेदेखील वाचा- Chrome आणि YouTube वरील वॉच हिस्ट्री डिलीट करायची आहे का? फॉलो करा ह्या सोप्या स्टेप्स
🔥 How I broke the internet today and what lessons can we learn from it? #Crowdstrike 🧐
Several things that make it a good fake that worked: 👇
1. No culprit named yet, I bring it on a platter, people like to have a culprit.
2- The culprit seems completely stupid, he is proud… pic.twitter.com/JFJ2MEYNMQ— Vincent Flibustier 👽 (@vinceflibustier) July 19, 2024
Vincent Flibustier ची ही पोस्ट 44 मिलीयन लोकांनी पाहिली आहे, तर 5 हजारहून अधिक लोकांनी या पोस्टवर रिप्लाय केला आहे. अनेकांनी त्याच्यावर राग व्यक्त केला आहे. यानंतर Vincent Flibustier त्याच्या अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये Vincent Flibustier सांगितलं आहे की, त्याने शेअर केलेली पोस्ट फक्त एक प्रँक होता. पण ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि लोकांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे Vincent Flibustier त्याच्या अकाऊंटवर ह्या सगळ्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर, Vincent Flibustier एक व्यंगचित्रकार आहे. तो वेगवेगळ्या टिव्हीशोमध्ये दिसतो. त्याने केवळ गंमत म्हणून शेअर केलेल्या फोटोमुळे लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.