Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला सरकारची मंजुरी; 2025 पर्यंत येणार पहिली चिप

पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गुजरातमधील साणंदमध्ये ह्या प्लांटची उभारणी केली जाणार आहे. या प्रकलपांतर्गत 2025 पर्यंत पहिली चीप तयार केली जाणार आहे.केन्स सेमिकॉनच्या कारखान्यासाठी कंपनीने 46 एकर जमीन संपादित केली आहे. यामध्ये बनवलेल्या सेमीकंडक्टरचा वापर ऑटोमोबाईल, वीज, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उद्योग इत्यादींमध्ये होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 03, 2024 | 08:57 AM
देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला सरकारची मंजुरी; 2025 पर्यंत येणार पहिली चिप (फोटो सौजन्य - pinterest)

देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला सरकारची मंजुरी; 2025 पर्यंत येणार पहिली चिप (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Follow Us:

देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या केन्स सेमीकंडक्टरच्या प्रस्तावाला सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकलपांतर्गत 2025 पर्यंत पहिली चीप तयार केली जाणार आहे. 3307 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात दरवर्षी 63 लाख चीप तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- YouTube वर सबस्क्रायबर्सची कमाल! कोणत्या क्रिएटर्सना मिळतं सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटण?

गुजरातमधील साणंदमध्ये देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटची उभारणी केली जाणार आहे. देशातील हा पाचवा आणि गुजरातमध्ये उभारला जाणारा चौथा सेमीकंडक्टर प्लांट आहे. देशात सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. यासाठी आतापर्यंत देशात 4 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात आले असून आता पाचवा प्लांट उभरण्याची तयारी सुरू झाली आहे. गुजरात व्यतिरिक्त आसाममध्ये एक प्लांट (टाटा समूहाचा) उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी साणंदजवळ अमेरिकन चिप उत्पादक मॅक्रॉनचा प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण आणि आयटी मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, देशात संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टमची स्थापना होऊ लागली आहे. देशातील पाचवा सेमीकंडक्टर प्लांट देखील लवकरच उभारला जाणारं आहे. सेमीकंडक्टर उद्योगाबाबत सरकार लवकरच काही धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे संकेत आश्विन वैष्णव यांनी दिले. 2025 च्या अखेरीस पहिले भारतीय बनावटीचे चिप्स येतील असे आश्विन वैष्णव यांनी आधीच सांगितले आहे. वैष्णव म्हणाले की, भारताच्या विकासात सेमीकंडक्टर उद्योग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा उद्योग पोलाद आणि रासायनिक उद्योगांसारखाच आहे ज्यामुळे इतर अनेक उद्योग उभारण्यास मदत होईल. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

हेदेखील वाचा- Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! फोनची बॅटरी खराब झाली आहे का? मग कंपनीच्या या ऑफरमध्ये बदलून घ्या

केन्स सेमिकॉनच्या कारखान्यासाठी कंपनीने 46 एकर जमीन संपादित केली आहे. या प्लांटमध्ये उत्पादित होणाऱ्या सेमीकंडक्टरचा मोठा भाग केन्स कंपनी स्वतः खरेदी करेल आणि त्याचा विविध उत्पादनांमध्ये वापर करेल. यामध्ये बनवलेल्या सेमीकंडक्टरचा वापर ऑटोमोबाईल, वीज, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उद्योग आदींमध्ये होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी केन्सने सांगितले होते की भारतातील सेमीकंडक्टर प्लांट तेलंगणामध्ये स्थापित केला जाईल.

तेलंगणा सरकारने देखील याबाबतची घोषणा केली होती. मात्र आता हा प्लांट गुजरात मध्ये उभारण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. वैष्णव म्हणाले की, धोलेरा (गुजरात) येथील टाटा समूहाच्या प्लांटचे काम सुरळीतपणे सुरू आहे. त्यासाठी जागा देण्यात आली असून डिझाइनिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कंपनी मॅक्रॉनच्या कारखान्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आसाममध्ये टाटा समूहाच्या प्लांटच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. देशात सेमीकंडक्टर उद्योगाची परिसंस्था तयार होऊ लागली आहे. 2025 पर्यंत पं चीप तयार केली जाणार आहे.

साणंदमध्येच CG पॉवर हा आणखी एक चिप बनवणारा कारखाना उभारला जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढतील. भारतात बनवलेल्या चिप्सचा बराचसा वापर देशांतर्गत केला जाईल. भारत एक खूप मोठी ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ आहे. या सर्व उद्योगांना चिप्सची गरज आहे.

Web Title: Goverment give approval to fifth semiconductor plant in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • semiconductor plant
  • technology

संबंधित बातम्या

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI
1

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI

Women Researchers : विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा अहवाल जाहीर; ‘या’ क्षेत्रात वाढला महिलांचा सहभाग..
2

Women Researchers : विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा अहवाल जाहीर; ‘या’ क्षेत्रात वाढला महिलांचा सहभाग..

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
3

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!
4

boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.