कितीही प्रयत्न केले तरी कधीच होणार नाही तुमचा स्मार्टफोन Hacked, फक्त या 5 गोष्टी करा
आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल फोन हे सर्वात महत्त्वाचे गॅझेट बनले आहे. लोकांशी संपर्कात राहण्याव्यतिरिक्त, ते आपल्याला अनेक दैनंदिन कामांमध्ये मदत करते. काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतांश कामे कागदावरच होत असत, आता अनेक कामे डिजिटल झाली आहेत. आता आपले अधिकतर पर्सनल डिटेल्स हे आपल्या मोबाईल फोनमध्येच राहतात. त्यामुळे आपला मोबाईल सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपला स्मार्टफोन दुसऱ्याच्या हातात पडला तर आपले मोठे नुकसान होऊ शकते.
जेव्हापासून इंटरनेटचा वापर वाढला आहे, तेव्हापासून मोबाईल फोनच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. घोटाळा आणि फसवणुकीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. पूर्वी मोबाईल चोरीला गेला तरच डेटा चोरीचा धोका होता, आता आपल्याकडे इंटरनेट असतानाही डेटा चोरीचा धोका आहे. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोन अधिक सुरक्षित बनवू शकता. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन हॅक होण्यापासून बचावला जाईल.
सावधान! फ्री मोबाईल रिचार्जच्या नावावर तुमचे बँक अकाउंट होऊ शकते रिकामे, TRAI ने दिली वॉर्निंग
पब्लिक WiFi चा वापर कधीही करू नका
बरेच लोक रेल्वे स्थानक, बस स्टॉप, हॉटेल इत्यादी ठिकाणी स्थापित केलेले पब्लिक वाय-फायचा (Public Wi-Fi) वापर करतात. जर तुम्हाला माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की स्कॅमर पब्लिक वाय-फाय द्वारे तुमचा फोन सहज ॲक्सेस करू शकतात. त्याच्या नेटवर्कद्वारे, सायबर गुन्हेगार फोनवर मालवेअर स्थापित करू शकतात आणि आपल्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवू शकतात. त्यामुळे पब्लिक वायफायचा कधीही वापर करू नये.
VPN चा वापर करा
जर तुम्हाला पब्लिक वाय-फाय वापरायचे असेल तर तुम्ही व्हीपीएन वापरणे आवश्यक आहे. VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क तुमचा पर्सनल डेटा ट्रांझिटमध्ये सुरक्षित ठेवते. हे तुमचे डिजिटल फूटप्रिंटला एनोनिमस करण्यासाठी देखील कार्य करते. VPN वापरून तुम्ही तुमची ब्राउझिंग ऍक्टिव्हिटीज, ओळख आणि लोकेशन लपवू शकता.
मजबूत पासवर्ड बनवा
आजच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉपपासून ते जीमेल (Gmail) आणि विविध ॲप्लिकेशन्सपर्यंत प्रत्येक गोष्टीचे संरक्षण करण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. अनेक लोक पासवर्ड बनवताना मोठी चूक करतात. बहुतेक लोकांना माहित असलेली तुमच्याबद्दलची माहिती असलेला पासवर्ड कधीही तयार करू नका. 12345, ABDCEFG सारखे सामान्य पासवर्ड कधीही ठेवू नका. असे सामान्य आणि छोटे पासवर्ड सहजपणे क्रॅक होतात. पासवर्ड तयार करताना विशेष अक्षरे समाविष्ट करण्याचे सुनिश्चित करा.
फोनमधून सर्व Contacts झाले गायब ? Gmail ची एक सेटिंग करेल तुमची मदत
Face Unlock कधीही वापरू नका
आजच्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे सिक्युरिटी लॉक अनलॉक फीचर्स दिलेले आहेत. आता फोनमध्ये पिन, पॅटर्नसह फेस अनलॉकची सुविधाही देण्यात आली आहे. तुम्हाला तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्ही फेस अनलॉक वापरणे टाळावे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फेस आयडी सहजपणे क्रॅक केला जाऊ शकतो. हे पिन किंवा पॅटर्न पासवर्डपेक्षा खूपच कमकुवत आहेत.
App Permission चेक करा
आपल्याला अनेकदा नवनवीन ॲप्लिकेशन्स आवश्यकता भासते. जर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते तुमच्याकडून कोणत्या प्रकारच्या पेरमिशन्स मागत आहे. बरेच लोक लक्ष न देता सर्व प्रकारच्या पेरमिशन्स देतात. यामुळेच इन्स्टॅालेशननंतर Allow बटनावर क्लिक करण्यापूर्वी विशेष लक्ष दिले पाहिजे.