
अनेकदा नवीन स्मार्टफोन विकत घेताना आपण त्याचे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी चेक करत असतो. अनेकजण तर फक्त चांगल्या कॅमेरा कॉलिटीसाठी नवीन फोन विकत घेत असतात. चांगल्या कॅमेरा कॅलिटीमुळे आपले फोटोही छान येतात. नवीन येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये या कॅमेऱ्याच्या कॉलिटीकडे विशेष करून लक्ष दिले जात आहे. मात्र कितीही चांगल्या कॅलिटीचा मोबाइल फोन घेतला तरी एका विशिष्ट काळानंतर आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची गुणवत्ता बिघडतेच. तुम्हाला जर माहिती असेल तर, बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनची कॉलिटी ही त्यांच्या किरकोळ चुकांमुळे बिघडते. जर तुमच्याही फोनच्या कॅमेऱ्याची कॉलीटी खराब झाली असेल तर तुम्ही काही खास टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.
ही समस्या का उद्भवते?
धूळ आणि घाण:
कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ किंवा घाण जमा झाल्यास त्याच्या कॅमेरा कॉलीटीवर परिणाम होतो. धुळीचा थर साचल्यामुळे, कॅमेऱ्यातून क्लिक केलेल्या फोटोंची दर्जा खराब होते.
स्टोरेज समस्या:
स्मार्टफोनचे स्टोरेज पूर्ण भरल्यास कॅमेराच्या कॉलीटीवरही याचा परिणाम होतो. हे अनेकांना थोडे वेगळे वाटू शकते. परंतु यामुळे फोटोंची दर्जा कमी होतो. त्यामुळे स्टोरेज नेहमी मोकळे ठेवावे.
हार्डवेअरमधील खराबी:
सर्वात महत्वाचे हार्डवेअर कॅमेरामध्ये आहे आणि जेव्हा त्यात खराबी असते, तेव्हा कॅमेराची कॉलीटी मोठ्या प्रमाणात खराब होते. कॅमेरा मॉड्यूलमध्ये बिघाड झाल्यामुळे, फोटोची तीक्ष्णता कमी होऊ लागते.
कॅमेरा सेटिंग :
फोटोग्राफी करताना कॅमेरा सेटिंग्ज बरोबर नसतील तर चांगले फोटो काढले जाऊ शकणार नाहीत. फोटोग्राफी करण्यापूर्वी कॅमेरा सेटिंग्ज लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
जुने सॉफ्टवेअर:
कॅमेराचा दर्जा किती चांगला असेल हे तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरत आहात यावर अवलंबून आहे. जर तुम्ही जुने सॉफ्टवेअर वापरत असाल तर कॅमेऱ्याची कॉलीटी चांगली नसेल. त्यामुळे तुम्ही अपडेटेड सॉफ्टवेअरसह फोन वापरत असल्याची खात्री करा.
[read_also content=”व्हॉट्सॲपवर प्रोफाईल फोटोसाठी येत आहे नवीन धमाकेदार फिचर, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/technology/new-super-feature-for-profile-photo-coming-to-whatsapp-read-more-537942.html”]
अशाप्रकारे सुधारा कॅमेरा कॉलीटी:
कॅमेरा लेन्स स्वच्छ करा:
कॅमेराची कॉलीटी सुधारण्यासाठी, तुमच्या फोनच्या कॅमेराची लेन्स मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा. कापडाच्या मदतीने धूळ आणि घाण सहजपणे साफ केली जाईल.
सॉफ्टवेअर अपडेट करा:
तुम्ही तुमचा फोन नियमितपणे अपडेट करत राहा. नवीन अपडेटमध्ये कॅमेऱ्यासाठी खास फीचर्सही आणले आहेत. ज्यामुळे कॅमेराचा परफॉर्मन्स चांगला होतो.
स्टोरेज मोकळे करा:
जर तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा व्यवस्थित काम करायला हवा असेल तर तुम्ही तुमच्या फोनमधील अधिकतरचे स्टोरेज मोकळे करा. यासाठी फोनमध्ये असलेले अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा.
फोन रीस्टार्ट करा:
कॅमेरामध्ये काही त्रुटी असल्यास फोन रिस्टार्ट करणे हा एक उत्तम पर्याय आहे. असे केल्याने फोनचा ओवरऑल परफॉर्मेंस पूर्वीपेक्षा चांगला होतो.