तुमच्या नावावर किती नंबर चालू आहेत
सध्या सायबर फसवणुकीत फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. तुम्हाला कळतही नाही आणि तुमच्यासोबत मोठा घोटाळा होतो. यात एक असा घोटाळाही आहे ज्यात सायबर गुन्हेगार तुमच्या नंबरचा गैरवापर करतात आणि लोकांना फसवणुकीचे बळी बनवतात. TRAI आणि दूरसंचार विभागाने फोन नंबरसाठी 9 क्रमांकांची मर्यादा निश्चित केली आहे, त्यापेक्षा जास्त असल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
अशा परिस्थितीत तुमच्या नावावर किती नंबर रजिस्टर आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीत तुम्ही येऊ नये. तुमच्या नावावर अनोळखी क्रमांक नोंदणीकृत असल्यास तो चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो. तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक शोधण्याचे दोन मार्ग आहेतआज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – झोमॅटो लवकरच लाँच करणार District App! मुव्ही तिकीट बुकिंग, फूड डिलिव्हरीसह अनेक सर्व्हिसचा घेता येईल लाभ
तुमचा मोबाईल नंबर किंवा सिमशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही संचार साथी पोर्टल tafcop.sancharsaathi.gov.in ला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला Citizen Centric Services वर टॅप करावे लागेल आणि नंतर Know Your Mobile Connection वर क्लिक करावे लागेल. तुम्ही त्याजागी तुमच्या मोबाईलचे कनेक्शन चेक करू शकता.
यासाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा टाईप करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि तुम्हाला तो OTP तिथे भरावा लागेल. तुम्ही OTP शेअर केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतील. तुमच्या नावावर किती सिमकार्ड जारी करण्यात आले आहेत हेदेखील इथे कळू शकेल.
संचार साथी पोर्टलवर चेक केल्यास तुम्हाला कळेल की, नक्की किती नंबर तुमच्या नावावर रजिस्टर आहेत. इथे तुमच्या नावावर कोणीतरी दुसरेच सिमकार्ड वापरत असल्याचे आढळल्यास, तुम्ही त्वरित त्या क्रमांकारावर तक्रार करू शकता. यानंतर तुमच्या नावावर किती नंबर आहेत आणि ज्याबद्दल तुम्ही तक्रार केली आहे त्याबद्दल सरकार चौकशी करेल. फसव्या पद्धतीने जर कोणी तुमचा नंबर जारी केला असेल तर सरकार तो नंबर लगेच ब्लॉक करेल.