तुमच्या स्मार्टफोनची Battery Health जरूर चेक करा, हा आहे सोपा मार्ग
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल आपली अनेक दैनंदिन कामे आता स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. स्मार्टफोन आपल्यासाठी तोपर्यंतच उपयुक्त आहे जोपर्यंत त्याची बॅटरी आहे आणि ती काम करत आहे. आपल्या स्मार्टफोनची लाइफ काय असेल आणि ते कसे परफॉर्म करेल हे बॅटरीच्या हेल्थवर बरेच अवलंबून असते. जर स्मार्टफोनची बॅटरी कमकुवत असेल तर आपल्याला ती पुन्हा पुन्हा चार्जिंगमध्ये ठेवावी लागेल आणि याचा परिणाम फोनच्या परफॉर्मेंसवरही होतो.
आपण नवीन फोन घेतला असला तरी काही काळानंतर बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. फोन पुन्हा पुन्हा चार्ज केल्यास त्याचा बॅकअपही कमी होऊ लागतो. यामुळे जुन्या फोनची बॅटरी नवीन फोनपेक्षा जास्त वेगाने कमी होते आणि चार्ज व्हायला वेळ लागतो. जर तुम्हाला तुमचा महागडा स्मार्टफोन जास्त काळ टिकून ठेवायचा असेल तर फोनच्या बॅटरीच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वारंवार चार्ज करावा लागत असेल आणि बॅटरी झपाट्याने संपत असेल, तर तो दुरुस्त करण्याऐवजी तुम्ही बॅटरीची हेल्थ एकदा नक्की तपासा.
हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपवर ट्रॅफिक चलन उपलब्ध होणार, जाणून घ्या कसे होईल पेमेंट?
आम्ही तुम्हाला सांगतो की, अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये बॅटरीची हेल्थ तपासण्यासाठी कोणतेही विशेष फीचर देण्यात आलेले नाही. तथापि, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही कोणते ॲप जास्त बॅटरी वापरत आहे हे शोधून काढू शकता आणि त्यानंतर जर ते ॲप आवश्यक नसेल तर तुम्ही ते ॲप काढून टाकू शकता. स्मार्टफोनच्या बॅटरीची हेल्थ तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
हेदेखील वाचा – BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज
अशा प्रकारे बॅटरीची स्थिती तपासा