व्हॉट्सॲप एक लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. अशात आता आणखीन एक नवीन फिचर व्हॉट्सॲपवर लाँच करण्यात आले आहे. हे फीचर युजरच्या फायद्याचे ठरणार आहे. आता व्हॉट्सॲपच्या मदतीने ट्रॅफिक चलन भरणे खूप सोपे होणार आहे, कारण लवकरच व्हॉट्सॲपच्या मदतीने ट्रॅफिक चालान भरता येणार आहे.
वास्तविक, परिवहन विभाग लवकरच व्हॉट्सॲपवर चलन पाठवणार आहे. तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाइन पेमेंट देखील करू शकता. मात्र, व्हॉट्सॲपद्वारे ट्राफिक चलन भरण्याची सुविधा प्रथम दिल्लीतून सुरू करण्यात येत आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या पोस्टनुसार, ट्रॅफिकचे उल्लंघन करणाऱ्यांना लवकरच व्हॉट्सॲपद्वारे ई-चलन पाठवले जाईल. तसेच, या लिंकसह पेमेंट पर्याय असेल.
हेदेखील वाचा – BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज
व्हॉट्सॲप चालान प्रणाली कशी काम करेल?
अहवालानुसार, दिल्लीत दररोज सरासरी 1,000 ते 1,500 ई-चलान जारी केले जातात. अशा परिस्थितीत, एकदा व्हॉट्सॲप चलन प्रणाली सक्रिय झाल्यानंतर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाची रक्कम त्वरित मोडमध्ये पाठविली जाईल. तसेच, Google Pay, BHIM किंवा इतर पेमेंट गेटवेच्या मदतीने त्वरित पेमेंट केले जाऊ शकते. ही प्रणाली हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये संदेश पाठवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यात प्रारंभिक दंडाच्या सूचनेपासून स्मरणपत्र, पेमेंट कन्फर्मेशनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. तसेच, पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला थेट व्हॉट्सॲपवरून पावत्या मिळू शकतील. या प्रणालीमध्ये फोटो, पीडीएफ आणि व्हिडीओ सारखे सर्व मीडिया फॉरमॅट देखील सपोर्ट केले जातील.
हेदेखील वाचा – नवीन स्कॅम! यूट्यूब व्हिडिओला लाईक करून व्यक्तीने गमावले तब्बल 56 लाख रुपये, तुम्ही ही चूक करू नका
व्हॉट्सॲपवरून थेट ऑनलाइन पेमेंट सुविधा
सध्या दिल्लीतील ट्रॅफिक चलन ई-चलन वेबसाइटद्वारे जारी केले जाते. पण व्हॉट्सॲपवर आधारित या सोल्यूशनच्या रोलआउटमुळे, दंड भरणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे होईल. तसेच, ऑनलाइन खरेदीची सुविधा आणि नवीन दंड किंवा उशीरा पेमेंटचा इशारा थेट वापरकर्त्याच्या व्हॉट्सॲपवर असेल. व्हॉट्सॲपद्वारे ट्रॅफिक चलन भरल्याने सामान्य युजर्सच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील. कारण अनेक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती योग्य वेळी मिळत नाही, त्यामुळे योग्य वेळी चलन भरले जात नाही. अशा परिस्थितीत दिल्लीतून व्हॉट्सॲप चलन जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही प्रणाली लागू केल्यानंतर लोकांना चलनाची माहिती मिळणे खूप सोपे होणार आहे. परिवहन विभागाकडून ही प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना त्याचा पुरेपूर लाभ घेता येईल.