BSNL नंबरवर 4G ऍक्टिव्ह आहे की नाही? या ट्रिकच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
BSNL 4G सेवा लवकरच संपूर्ण देशात सुरू होणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी देशभरात 4G लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नेटवर्क विस्तारासाठी देशातील विविध दूरसंचार मंडळांमध्ये नेटवर्क अपग्रेडिंग सुरू केले आहे. कंपनीने आतापर्यंत 25 हजारांहून अधिक 4G टॉवर्स बसवले आहेत. येत्या काही महिन्यांत 75 हजार टॉवर्सचे अपग्रेडेशन होणार आहे. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, BSNL 1 लाख नवीन 4G टॉवर्स बसवण्याची योजना आखत आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही लवकरच BSNL 4G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
अहवालानुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण देशात BSNL 4G सेवा एकाच वेळी सुरू केली जाऊ शकते. सरकार सध्या देशातील अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये 4G ची चाचणी करत आहे. टेलिकॉम कंपनीने आपल्या युजर्सना त्यांचे सिम कार्ड विनामूल्य अपग्रेड करण्यास सांगितले आहे. 4G/5G सेवेसाठी, युजर्सना 5G सक्षम सिम कार्ड दिले जात आहे. जर तुमच्याकडे बीएसएनएल नंबर असेल तर तुम्ही क्षणार्धात शोधू शकता की तुमच्या नंबरवर 4G ऍक्टिव्ह आहे की नाही. हे तपासल्यानंतर, तुम्ही तुमचे सिम कार्ड विनामूल्य अपग्रेड करू शकता.
हेदेखील वाचा – मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार! ग्राहकांना महागाईचा फटका कधी बसणार? जाणून घ्या
तुमचा BSNL नंबर 4G/5G वर अपग्रेड झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल – https://rajasthan.bsnl.co.in/4G/getmobileinfo.php. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सबमिट बटणावर टॅप करा किंवा क्लिक करा. यानंतर तुमचा नंबर 4G/5G वर अपग्रेड झाला आहे की नाही याची माहिती देणारा मेसेज तुम्हाला मिळेल. जर तुमचा नंबर 4G/5G वर अपग्रेड केला गेला नसेल, तर तुम्हाला जवळच्या BSNL टेलिफोन एक्स्चेंजला भेट द्यावी लागेल आणि जारी केलेले नवीन सिम कार्ड घ्यावे लागेल. यासाठी आधार कार्डसह आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावीत.
हेदेखील वाचा – Jio Airtel Vi’चा गर्व धुळीत मिळवला, नेटवर्क सोडण्याचा नवा विक्रम, BSNL’ची फुल मजा
BSNL देशात नवीन 5G नेटवर्क लाँच करण्याच्या विचारत आहे. यासाठी कंपनीनं काही टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागेदारी केली आहे. BSNL ची आगामी 5G सेवा स्वस्त असण्याची शक्यता आहे. खाजगी कंपन्यांनी दरवाढ केली आहे परंतु अजूनही BSNL चे प्लॅन अद्याप बदलले नाहीत , उलट नवीन स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे आशा आहे की BSNL ची 5G सेवा देखील इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असेल.