घरबसल्या काही मिनिटांतच अशाप्रकारे डाउनलोड करा पॅन कार्ड! खूप कामाची आहे ही सोपी ट्रिक
सध्या पॅनकार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. बँकिंग ते फायनान्सशी संबंधित प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज भासते. बँक खाते ओपन करणे, कोणती मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे अशा अनेक कामांसाठी आजकाल पॅन कार्ड फार महत्त्वाचे आहे. पॅनकार्ड नसल्यास तुमची अनेक कामे रखडली जाऊ शकता.
अशा परिस्थितीत पॅन कार्ड हरवले किंवा तुटले तर घाबरण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्ही घरबसल्या तुमचे पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकता, याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरबसल्या तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच तुमचे पॅनकार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हेदेखील वाचा – आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा
घरबसल्या डाउनलोड करू शकता पॅन कार्ड
इनकम टॅक्स विभागाने पॅनकार्डधारकांसाठी ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही तुमच्या पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी ई-पॅन कार्डच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता. ही कॉपी तुम्ही करून तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या पॅन कार्डची हार्ड कॉपी घरी विसरलात तरीही कोणतीही अडचण येणार नाही. ई-पॅन कार्डद्वारे तुम्हाला कुठेही किंवा कोणत्याही कामासाठी आपले पॅन कार्ड कॅरी करण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या NSDL च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमचे पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.
हेदेखील वाचा – अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड चेक करू शकता, या स्टेप्स फॉलो करा
घरबसल्या पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनवर तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा, पॅन कार्डची ई-कॉपी असेलेली डाउनलोड फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्डची आवश्यकता असेल. तुमच्या पासवर्डमध्ये तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये असेल. फाइल उघडण्यासाठी तुम्ही हे एंटर करू शकता.