WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? (फोटो सौजन्य - pinterest)
प्रत्येकजण त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी WhatsApp चा वापर करतो. कधी पर्सनल तर कधी प्रोफेशनल कामांसाठी आपण WhatsApp वापरतो. WhatsApp मध्ये आपल्याला आपला प्रोफाईल फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन दिलेला असतो. यामध्ये आपण आपले नवनवीन फोटो अपलोड करत असतो. पण WhatsApp च्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला एक QR कोड पाहायला मिळतो. या QR कोडचं नक्की काम काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? WhatsApp च्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला असलेल्या QR कोडचं काम 90 टक्के लोकांना माहिती नसतं. तुम्ही कधी विचार केला आहे का, WhatsApp च्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला QR कोड का दिलेला असतो?
हेदेखील वाचा- माझे वडील क्रूर, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही; ट्रान्सजेंडर मुलीचा Elon Musk वर पुन्हा गंभीर आरोप
तुम्ही WhatsApp ओपन केल्यानंतर जेव्हा सेटिंग्जवर टॅप करता तेव्हा तुमच्यासमोर प्रोफाइल आणि सेटिंग्ज असलेले पेज उघडतं. या पेजवर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो आणि त्याच्या बाजूला एक QR कोड पाहायला मिळतो. या QR वर टॅप करताच तुमच्या फोनची ब्राइटनेस वाढेल आणि QR कोड संपूर्ण स्क्रीनवर दिसू लागेल. हा तुमच्या WhatsApp प्रोफाइल आणि नंबरशी लिंक केलेला QR कोड आहे. इतर कोणताही WhatsApp युजर हा QR कोड त्याच्या कॅमेऱ्याने स्कॅन करू शकेल. हा QR कोड स्कॅन होताच, तुमचे WhatsApp चॅट पेज दुसऱ्या WhatsApp युजरच्या फोनवर ओपन होईल.
हेदेखील वाचा- गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या हातात दिसलं प्रीमियम घड्याळ! किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल हैराण
WhatsApp DP चा QR कोड देखील तुमच्या गोपनीयतेशी संबंधित आहे. हा QR कोड एखाद्याच्या हातात असल्यास कोणतीही अज्ञात व्यक्ती तुमचे WhatsApp ऍक्सेस करू शकते. या QR कोडच्या मदतीने, इतर कोणतीही व्यक्ती तुमचा WhatsApp नंबर जाणून घेतल्याशिवाय तुमच्या WhatsApp चॅट पेजवर प्रवेश करू शकते. म्हणजेच QR कोडच्या मदतीने तुमचा फोन नंबरही कोणत्याही अज्ञात व्यक्तिच्या हातात जाऊ शकतो. हा QR कोड फक्त तेव्हाच वापरण्याचा सल्ला दिला जातो जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या इच्छेने तुमचं WhatsApp अकाऊंट इतर कोणाच्या फोनमध्ये ओपन करायचं आहे. नंबर शेअर करण्याचा त्रास टाळण्यासाठी WhatsApp च्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला QR कोड देण्यात आलेला असतो.
WhatsApp त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक पाऊल उचलतं आहे. कंपनी सुरक्षेशी संबंधित अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट देखील लाँच करत आहे. ज्यामुळे युजर्सच्या सुरक्षेचे उल्लंघण होणार नाही, आणि त्यांची माहिती लिक होऊन कोणताही हॅकर या गोष्टीचा फायदा घेणार नाही. पण काहीवेळा युजर्सची सुरक्षा त्यांच्याच हातात असते. युजर्सच्या एका चुकिमुळे त्यांची सुरक्षा भंग होऊन त्यांचे WhatsApp अकाऊंट इतर लोकांच्या फोनमध्ये ओपन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक युजरने त्याचा WhatsApp च्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला असलेला QR कोड कोणत्याही अज्ञात व्यक्तिसोबत शेअर केला जाणार नाही, या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.