Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध; 10 वर्षांत मोबाईल युजर्समध्ये प्रचंड वाढ

डिजीटल इंडिया प्रोजक्ट लाँच झाल्यानंतर शासानाने देशातील खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सुरु करण्याचा निर्णय घेतला. डिजीटल इंडिया प्रोजक्टनंतर आता भारतातील सुमारे 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यामुळे मोबाईल युजर्सची संख्या देखील प्रचंड वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2024 | 12:01 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भारत डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली डिजीटल इंडिया प्रोजेक्ट लाँच केला होता. या प्रोजेक्टअंतर्गत भारताला डिजीटल बनवण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या. यातीलच एक योजना म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करणं. डिजीटल इंडिया प्रोजेक्ट लाँच झाल्यानंतर शासानाने देशातील खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. डिजीटल इंडिया प्रोजेक्टनंतर आता भारतातील सुमारे 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यामुळे मोबाईल युजर्सची संख्या देखील प्रचंड वाढली आहे.

हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत सध्या देशातील 95 टक्के गावांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. याबाबत शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने माहिती दिली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2024 पर्यंत भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या 95.44 कोटी आहे. यापैकी 39.83 कोटी युजर्स भारताच्या खेड्यापाड्यांमधील आहेत. एप्रिल 2024 पर्यंत 6,44,131 गावांपैकी 6,12,952 गावांमध्ये 3G/4G मोबाईल इंटरनेट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत, सरकारने मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरे तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

हेदेखील वाचा- बजेट किंमतीत Samsung Galaxy F14 5G भारतात लाँच! जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

मोबाईल आणि इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल युजर्सची संख्या 25.15 कोटींवरून 95.44 कोटी झाली आहे. यापैकी 39.83 कोटी युजर्स भारताच्या खेड्यापाड्यांमधील आहेत. वार्षिक आधारावर 14.26 टक्के CAGR ची वाढ झाली आहे. इंटरनेटची उपलब्धता वाढत असल्याने मोबाईल युजर्सची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. डिजीटल इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सध्या देशातील 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.

डिजीटल इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत गेल्या 10 वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आला असल्याचं सरकारने म्हटलं आहे. यामध्ये टियर 2 आणि टियर 3 शहरे तसेच देशाच्या अंतर्गत भागांचा समावेश आहे. ग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने ‘भारतनेट’ प्रकल्प सुरू केला होता. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे हा सराकारने सुरु केलेल्या भारतनेट प्रकल्पाचा उद्देश होता. सरकारने सांगितलं की, 2.2 लाख ग्रामपंचायतींपैकी 2.13 लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये, सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसवण्याच्या नियमात बदल केला होता, जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देता येईल.

 

Web Title: Huge increase in mobile users in 10 years internet service available in 95 percent of the countrys villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 12:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.