फोटो सौजन्य - pinterest
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या JIO, Airtel आणि VI यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत 3 जुलैपासून वाढ केली आहे. कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्यामुळे अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. JIO, Airtel आणि VI यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्यामुळे BSNL ला अच्छे दिन आले. अनेक युजर्स BSNL कडे वळले. BSNL मध्ये नंबर पोर्ट करण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. BSNL ला लोकांची पंसती मिळत असताना TATA Consultancy Service ने BSNL सोबत एक करार केला होता. या कराराअंतर्गत 1000 खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेदेखील वाचा- तुमची मुलंसुध्दा सतत रिल्स स्क्रोल करतात का? मग आत्ताच Google चं ‘हे’ फीचर वापरा
TATA आणि BSNL यांच्यामध्ये सुमारे 15 हजार कोटींचा करार झाला होता. महिनाभरापूर्वी झालेल्या या करारानंतर आता गावांमध्ये इंटरनेट चाचणी सुरु करण्यात आली आहे. BSNL ला मिळणारी लोकांची पसंती आणि TATA आणि BSNL यांच्यामधील करारानंतर आता होत असलेली इंटरनेट चाचणी यामुळे JIO आणि Airtel ची डोकेदुखी वाढणार आहे. कारण वाढत्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीमुळे आधीच ग्राहक कंपन्यांवर नाराज आहेत. अशातच आता BSNL त्यांच्या युजर्ससाठी उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे BSNL कडे जाणाऱ्या युजर्सच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. TATA आणि BSNL चा करार युजर्ससाठीही फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार नाही कोणतेही पेमेंट; बँकेने दिला अलर्ट
काही वर्षांपूर्वी टाटा इंडिकॉममध्ये रिचार्जवर फ्री मिनिटे दिली जायची. त्यानंतर आता TATA पुन्हा टेलिकॉम कंपन्यांच्या शर्यतीत प्रवेश करणार आहे. पण यावेळी वेगळी पध्दत आणि स्मार्ट नेटवर्कसह TATA या शर्यतीत उतरणार आहे. TATA आणि BSNL यांच्यामधील कराराचा परिणाम टेलिकॉम ऑपरेटरवर होणार आहे. TATA ने BSNL मध्ये गुंतवणूक केली होती आणि 15 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. याध्ये डेटा सेंटर उभारण्याचा करार करण्यात आला होता. या गुंतवणुकीनंतर हे स्पष्ट झालं की TCS (TATA Consultancy Services) 4 क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे जे खूप फायदेशीर ठरणार आहे. या करारानंतर अनेक अफवा पसरल्या होत्या. ज्यामध्ये TATA ने BSNL विकत घेतल्याचं सांगण्यात आलं होतं, पण तसं नाही. TATA आणि BSNL यांच्यामध्ये 15 हजार कोटींचा करार झाला असून TATA ने नुकतीच BSNL मध्ये गुंतवणूक केली आहे.
TATA आणि BSNL यांच्यामधील करारानंतर आता देशातील 1 हजार गावांमध्ये जलद इंटरनेट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याची चाचणी BSNL ने सुरू केली आहे. आतापर्यंत BSNL देशभरातील अनेक गावांमध्ये 3G सेवा पुरवत होती. मात्र आता लवकरच कपंनी 1 हजार गावांमध्ये 4G सेवा सुरु करणार आहे. याशिवाय, BSNL युजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. BSNL 5G नेटवर्कमध्ये प्रवेश करत आहे आणि लवकरच मोठ्या शहरांमध्ये BSNL 5G ची चाचणी सुरू होणार आहे.