भारतात टेलिग्रामवर बंदी घातली तर काय होईल? हे आहेत बेस्ट अल्टरनेटिव ऑप्शन्स
गेल्या काही वर्षांत टेलिग्रामचा वापर भारतात झपाट्याने वाढला आहे. संपूर्ण जगासोबतच भारतीय युजर्सनाही टेलीग्राम ॲपच्या फीचर्स फार आवडत आहेत. त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे आणि सोयीस्कर वापरामुळे, बऱ्याच लोकांनी ते त्यांचे प्रायमरी मेसेंजर याला म्हणून स्वीकारले आहे. त्यातच आता टेलिग्रामच्या काही चुकीच्या ऍक्टिव्हिटीजमुळे भारतात यावर बंदी येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशात जर खरंच टेलिग्राम बंद झाले तर तुम्ही यासाठीचे काही अल्टरनेटिव ऑप्शन्सचा वापर करू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून टेलिग्रामला चांगले दिवस येत नाहीत. अलीकडेच टेलिग्रामच्या सीईओला अटक करण्यात आली आहे. आता अशा बातम्या येत आहेत की भारत सरकार टेलीग्रामची भारतात उपस्थिती आणि त्यांच्या सुरक्षा धोरणांची चौकशी करण्यात येत आहे. जर टेलीग्रामने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसह चुकीच्या धोरणांचे पालन केले असेल तर भारतातही त्यावर बंदी घातली जाऊ शकते.
व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय मेसेंजर ॲप्सपैकी एक आहे, जे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जरी त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये टेलिग्रामपेक्षा कमी मजबूत आहेत, तरीही हा लोकांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. व्हॉट्सॲप मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, जे तुमचे मेसेज सुरक्षित ठेवते. याशिवाय व्हॉट्सॲपमध्ये ग्रुप चॅट, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल आणि स्टेटस अपडेट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
हेदेखील वाचा – भारतात टेलिग्रामवर बंदी येणार? सरकारचा तपास सुरु, चुकीच्या कामांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप
मायक्रोसॉफ्ट टीम्स हे फक्त मेसेजिंग ॲप नाही तर यात बरेच काही आहे. याद्वारे तुम्ही अनेक गोष्टींचा लाभ घेऊ शकता. हा एक कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म आहे, जे संपूर्ण Microsoft 365 सूटसह एकीकृत होते. माइक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरक्षा ऑफर करतात, ज्यामुळे व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांसाठी सुरक्षित पर्याय बनतो. युजर्स व्हिडिओ कॉन्फरन्स, फाइल्स शेअर करणे यासह अनेक गोष्टी याठिकाणी करू शकतात.
सिग्नल हे एक ओपन सोर्स मेसेंजर ॲप आहे, जे त्याच्या मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. हा एक पूर्णपणे एनक्रिप्टेड मेसेंजर आहे, जो तुमचे संदेश सुरक्षित ठेवतो. सिग्नलमध्ये ग्रुप चॅट, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल आणि स्टेटस अपडेट यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. याव्यतिरिक्त, सिग्नलमध्ये ऑटो-डिलीट वैशिष्ट्य देखील आहे, जे ठराविक कालावधीनंतर तुमचे संदेश ऑटोमॅटिक हटवते.