कानपूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आतापर्यंत तुम्ही हिरव्या, निळ्या, काळ्या, लाल, पिवळ्या, चमकणाऱ्या रंगाची शाई असलेले पेन पाहिले असेल. परंतु आयआयटी कानपूरने (IIT Kanpur) एक चांदीची शाई (Silver Ink) असणारे पेन तयार केले आहे.
याच्या मदतीने आता १२ वीपर्यंतचे विद्यार्थी (HSC Students) इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) शिकू शकतील आणि अत्यंत सहजपणे साधारण कागदावर स्वतःचे सर्किटही (Circuit) तयार करू शकणार आहेत. आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप लिखोट्रानिक्स (Startup Likhotronics) अंतर्गत फ्लेक्सिबल इलेक्ट्रॉनिक्स विभागात डॉ. आशीष आणि प्राध्यापक महापात्रा यांच्या टीमने एक उत्पादन तयार केले आहे. याचे नाव ‘सीखो सर्किट’ ठेवण्यात आले आहे.
अशाप्रकारचे पेन तयार करण्यामागे विविध कारणांमुळे प्रयोगशाळांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी असा हेतू होता. एका उपकरणाने हँडस ऑन ट्रेनिंग म्हणून बसल्या-बसल्यास स्वतःच्या प्रयोगांना शिकण्यासह त्यांना एक नव्या पातळीवर नेण्यास मदत होणार आहे. यापूर्वी केवळ अमेरिकेत अशाप्रकारचे किट तयार होत होते. परंतु आता आयआयटी कानपूरमध्ये याची निर्मिती सुरू झाली आहे. हे उत्पादन भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त लाभ होणार आहे. याच्या मदतीने प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रतिभेला अधिक उत्तम पद्धतीने वाव देता येणार असल्याचे डॉ. आशीष यांनी सांगितले आहे.