भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात Google ने देखील सहभाग! जाणून घ्या आजच्या डूडलची थीम (फोटो सौजन्य - google)
भारतात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज 15 ऑगस्टचा दिवस प्रत्येक भारतीसाठी खास आहे. आजच्या दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. 15 ऑगस्टला ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भरताचा तिरंगा वरती चढवला गेला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आणि संपूर्ण जनतेला संबोधित केलं. भारतवासियांसोबतच Google ने देखिल आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभाग घेतला आहे. Google दरवर्षी डूडलद्वारे भारताच्या स्वातंत्र्य दिनाला खास बनवतो. चला जाणून घेऊया यावेळी Google च्या डूडलची थीम काय होती आणि ते कोणी तयार केले?
हेदेखील वाचा- WhatsApp stickers आणि GIF चा वापर करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
15 ऑगस्ट 2024 चे Google डूडल वृंदा जावेरी यांनी तयार केलं आहे. वृंदा एक फ्रीलान्स आर्ट डायरेक्टर, इलस्ट्रेटर आणि ॲनिमेटर आहे. संपादकीय चित्रे तयार करण्याव्यतिरिक्त, त्या मोठ्या कंपन्या, स्टुडिओ आणि विविध उद्योगांसाठी सेल ॲनिमेशन, शैली फ्रेम आणि उत्पादन चित्रे देखील तयार करतात. सध्या त्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे राहतात.
2024 च्या स्वातंत्र्य दिनासाठी Google डूडलची थीम आर्किटेक्चर म्हणून ठेवण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, देशातील विविध संस्कृती एकाच धाग्यात विणलेल्या दर्शविल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये विविध रचना दर्शविल्या आहेत. या सर्व दारांमधून सर्व Google अक्षरे G, O, O, G, L आणि E दर्शविली आहेत.
हेदेखील वाचा- Independence Day 2024: भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करा आणि मिळवा हर घर तिरंगा सर्टिफिकेट
2023 चे Google डूडल दिल्लीच्या अतिथी कलाकार नम्रता कुमार यांनी तयार केलं होतं. नम्रताही ग्राफिक डिझायनर आहे. त्यांनी 2010 मध्ये सृष्टी स्कूल ऑफ आर्ट्स अँड डिझाईन, बेंगळुरू येथून पदवी प्राप्त केली. हे डूडल बनवण्यासाठी त्यांनी संशोधन करून देशातील विविध कापड हस्तकला प्रकार ओळखले होते. वेगवेगळ्या नक्षी-विणकामाच्या शैलीच्या सहाय्याने देशाच्या विविध भागांना समतोलपणे सादर करण्याचा नम्रता यांचा उद्देश होता, त्यात त्या यशस्वी झाल्या.
दरम्यान, 1947 मध्ये या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. यामुळे दरवर्षी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे राष्ट्रगीताच्या सुरात स्मरण केले जाते. यावेळी देशाच्या विविध भागात त्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली जाते ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीपर गीते गायली जातात.
आजच्या दिवशी अनेक जण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मेसेज करून किंवा कॉल करून स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही आता डिजिटली सुद्धा स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. WhatsApp युजर्स WhatsApp Stickers किंवा GIF च्या माध्यमातून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात. व्हॉट्सॲपच्या या फीचर्सचा वापर करून तुम्ही स्वातंत्र्य दिन आणखी खास बनवू शकता.