AI वर आधारित इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी
इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. या ईव्हेंटचे संपूर्ण लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI वर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ईव्हेंटचे उद्घाटन करणार आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी दळणवळण क्षेत्राच्या भविष्यातील रोडमॅपचे अनावरण देखील करणार आहेत. इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटमध्ये 900 स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. या स्टार्टअप्समध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टरशी संबंधितांचा समावेश असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा- या दिवशी लाँच होणार Honor Magic 7 सिरीज! क्वालकॉमच्या नवीन चिपसेटसह मिळणार AI फीचर्स
आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या इंडियन मोबाइल काँग्रेस (IMC) ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI (Gen AI) वर खूप लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हे दोन्ही तंत्रज्ञान दळणवळण सेवांमध्ये नवी क्रांती आणणारे असल्याचे मानले जात आहे.दूरसंचार विभाग (DOT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स (COAI) यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटचे आयोजन केले आहे. (फोटो सौजन्य – X)
दूरसंचार विभाग (DOT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स (COAI) यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राद्वारे, AI सारखे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी संधी आणि आव्हाने कशी निर्माण करू शकते हे सर्वसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. AI संदर्भात जगभरात कोणत्या प्रकारचे काम केले जात आहे, याची माहिती देखील या चर्चासत्रात दिली जाणार आहे.
इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहेत. त्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी दळणवळण क्षेत्रातील भारत सरकारच्या भविष्यातील रोडमॅपचे अनावरण करणार आहेत. विशेषतः, पंतप्रधान मोदी भविष्यात या क्षेत्राचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडेल आणि भारताच्या धोरणात्मक गरजा पूर्ण होतील यावर सरकारचे मत मांडण्याची शक्यता आहे. यावेळी इंडियन मोबाईल काँग्रेसची थीम ‘द फ्युचर इज नाऊ’ आहे. त्याचा प्रमुख भागीदार क्वालकॉम आहे.
हेदेखील वाचा- सोशल मिडीयावरील पोस्ट खरी की खोटी? अशा प्रकारे तपास करतात सायबर सुरक्षा एजन्सी, जाणून घ्या
2017 पासून आयोजित करण्यात येत असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस ईव्हेंटमध्ये यावेळी सरकारने दळणवळण क्षेत्रातील स्टार्टअपला अधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, यामध्ये जवळपास 900 स्टार्टअप्स सहभागी होणार असल्याचे माहिती मिळाली आहे. यापैकी बरेच स्टार्टअप क्वांटम तंत्रज्ञान, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, क्लाउड आणि इमेज कॉम्प्युटिंग, आईओटीशी संबंधित आहेत. याशिवाय सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांशी संबंधित काही स्टार्टअप्सही येथे सहभागी होतील.
संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधतील. यावेळच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे IMC सोबत वर्ल्ड टेलीकम्यूंनिकेशन स्टँडर्ड असेंब्लीचेही आयोजन करण्यात आले आहे. आयएमसीचे सीईओ रामकृष्ण पी यांनी सांगितलं की ही संधी भारताला जागतिक दळणवळणाच्या जगात आपली क्षमता दाखवण्याची सुवर्ण संधी देईल.
इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट अनेक डिव्हाईस लाँच होण्याची अपेक्षा आहे.Xiaomi 16 ऑक्टोबर रोजी नवीन स्मार्टफोन लाँच शकतो, जो Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन्सशिवाय टेक्नॉलॉजी गॅजेट्सही दाखवण्यात येणार आहेत.