
भारताने जागतिक तंत्रज्ञानातील बदलाचे नेतृत्व केले पाहिजे! भाविश अग्रवाल यांचं विधान (फोटो सौजन्य - pinterest)
ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय नेवीगेशन ॲप MapMyIndia ने ओलावर गंभीर आरोप करत न्यायालयात खटला दखल केला आहे. या प्रकरणानंतर ओला कॅब आणि भाविश अग्रवाल यांची प्रचंड चर्चा सुरू होती. अशातच आता भाविश अग्रवाल यांनी एका मुलाखीदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने जागतिक तंत्रज्ञानातील बदलाचे नेतृत्व केले पाहिजे, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
हेदेखील वाचा- OLA वर भारतीय नेव्हिगेशन कंपनीचा मोठा आरोप; कारवाई होण्याची शक्यता
मुलाखतीदरम्यान त्यांनी देशातील वाढती रोजगार निर्मिती आणि जागतिक तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांबद्दल मोकळेपणाने सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, जागतिक तंत्रज्ञान ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता भारताने त्यात नेतृत्व केले पाहिजे. कामाच्या ठिकाणापासून ते AI पर्यंत भाविश अग्रवाल काय म्हणाले ते जाणून घेऊया.
जगभरात तंत्रज्ञानात अनेक मोठे बदल होत आहेत. जागतिक तंत्रज्ञानात होत असलेल्या या बदलांचे नेतृत्व भारताने करायला हवे, असे ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचे मत आहे. यासाठी अग्रवाल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार करत आहेत. देशात भविष्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ते AI वरही भर देत आहे. भाविश अग्रवाल यांनी मुलाखतीत या सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाद्वारे टेस्लासह जागतिक EV उत्पादकांना वित्तीय प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या हालचालीचे समर्थन केले.
अग्रवाल म्हणाले की, आम्ही देशातील EV इकोसिस्टमच्या विकासासाठी मदत करत आहोत. खाजगी क्षेत्राला रोजगार निर्मितीसाठी मोठे काम करावे लागेल. यासाठी सक्षम वातावरण निर्माण करून असमतोल दुरुस्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे. भारताने सर्व प्रकारच्या गुंतवणूकींना आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर स्थापित कंपनी देशातील EV इकोसिस्टमच्या विकासासाठी मदत करेल.
हेदेखील वाचा- रिकामी भांडी जास्त आवाज करतात… MapMyIndia च्या आरोपांवर भावेश अग्रवाल यांचं उत्तर
AI बद्दल अग्रवाल म्हणाले की, जागतिक तंत्रज्ञान बदलत आहे आणि AI हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. या प्रवासाचे नेतृत्व आपण भारतात केले पाहिजे. जेव्हा लोकांना भीती वाटत होती की संगणक नोकऱ्या काढून घेतील, तेव्हा IT बूमने भारतात नोकऱ्या निर्माण केल्या आणि AI हे असेच एक साधन आहे. AI कोणाचीही जागा घेऊ शकत नाही. जागतिक तंत्रज्ञान ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता भारताने त्यात नेतृत्व केले पाहिजे.
दरम्यान, MapMyIndia ने ola वर गंभीर आरोप करत न्यायालयात खटला दखल केला आहे. MapMyIndia ने ऑनलाइन टॅक्सी कंपनी Ola वर आरोप केला होता की, कंपनीने Ola Cabs चा नकाशा तयार करण्यासाठी MapMyIndia कंपनीचं खास सॉफ्टवेअर चोरलं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून Ola मॅप विकसित केलं आहे. आता Ola Cabs चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी MapMyIndia च्या या आरोपांवर उत्तर दिलं आहे. रिकामी भांडी जास्त आवाज करतात, असं भाविश अग्रवाल यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.