रिकामी भांडी जास्त आवाज करतात... MapMyIndia च्या आरोपांवर भावेश अग्रवाल यांचं उत्तर (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
काही दिवसांपूर्वी भारतीय नेव्हिगेशन कंपनी MapMyIndia ने ऑनलाइन टॅक्सी कंपनी Ola वर आरोप केला होता की, कंपनीने Ola Cabs चा नकाशा तयार करण्यासाठी MapMyIndia कंपनीचं खास सॉफ्टवेअर चोरलं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून Ola मॅप विकसित केलं आहे. आता Ola Cabs चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी MapMyIndia च्या या आरोपांवर उत्तर दिलं आहे. रिकामी भांडी जास्त आवाज करतात, असं भाविश अग्रवाल यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या या उत्तरांवर अद्याप MapMyIndia ने प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेदेखील वाचा- OLA वर भारतीय नेव्हिगेशन कंपनीचा मोठा आरोप; कारवाई होण्याची शक्यता
संकल्प कार्यक्रमादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत Ola Cabs चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं की, या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. MapmyIndia ने जे आरोप केले त्याला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहोत. रिकामी भांडी जास्त आवाज करतात, Ola ची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांनी आयपीओच्या आधी खूप आवाज केला आणि संधी शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
या नोटीसनंतर Ola Cabs इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याकडूनही या नोटीसवर उत्तर आलं आहे, Ola Cabs ने सांगितले की, Ola Cabs मीडिया रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यांवर आपली भूमिका मांडू इच्छित आहे. आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे आरोप खोटे, दुर्भावनापूर्ण आणि दिशाभूल करणारे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.
हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, Ola ने MapMyIndia कंपनीचं खास सॉफ्टवेअर चोरलं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून Ola मॅप विकसित केलं आहे, असा आरोप MapMyIndia कंपनीने केला होता. याप्रकरणी ola वर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ola ने मेड फॉर इंडिया आणि प्राईज्ड फॉर इंडिया नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. OLA ची AI कंपनी Krutrim च्या मदतीने रोडमॅप तयार करण्यात आला आसल्याचा दावा OLA ने केला होता.
पण ola ने तयार केलेला रोडमॅप तयार MapMyIndia कंपनीच्या सॉफ्टवेअर चा वापर करून तयार करण्यात आले असल्याचा आरोप MapMyIndia कंपनीने केला आहे. याप्रकरणी MapMyIndia कंपनीने OLA ला कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. त्यामुळे आता OLA वर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. MapMyIndia आरोप केला आहे की, Ola ने त्यांचे खास सॉफ्टवेअर चोरले आहे आणि ते OLA नकाशे विकसित करण्यासाठी वापरलं आहे. OLA ने त्यांच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अधिकारांचे उल्लंघन केलं आहे. या आरोपांना आता Ola Cabs चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी चोख उत्तर दिलं आहे.






