फोटो सौजन्य - pinterest
भारतीय नेव्हिगेशन कंपनी MapMyIndia ने ऑनलाइन टॅक्सी कंपनी OLA वर गंभीर आरोप केला आहे. Ola ने MapMyIndia कंपनीचं खास सॉफ्टवेअर चोरलं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून Ola मॅप विकसित केलं आहे, असा आरोप MapMyIndia कंपनीने केला आहे. याप्रकरणी आता ola वर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp वर लवकरच येतंय डबल टॅप रिअॅक्शन फीचर! आता मॅसेजला रिअॅक्शन देणं होईल अधिक सोपं
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी ओला ने मेड फॉर इंडिया आणि प्राईज्ड फॉर इंडिया नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. OLA ची AI कंपनी Krutrim च्या मदतीने रोडमॅप तयार करण्यात आला आसल्याचा दावा OLA ने केला आहे. OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ओलामॅप बाबत घोषणा करत, OLA आता Google Map ची मदत घेणार नसल्याचं सांगितलं होतं. पण आता ola ने तयार केलेला रोडमॅप तयार MapMyIndia कंपनीच्या सॉफ्टवेअर चा वापर करून तयार करण्यात आली असल्याचा आरोप कंपनीने केला आहे.
हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या
याप्रकरणी MapMyIndia कंपनीने OLA ला कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. त्यामुळे आता OLA वर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोर्ब्स इंडियाच्या अहवालानुसार, MapMyIndia ने OLA वर डेटा चोरीशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. MapMyIndia डेडिकेटेड नेव्हिगेशन सोल्यूशन्स ऑफर करते आणि ती एक भारतीय मॅपिंग कंपनी आहे. ह्याच भारतीय मॅपिंग कंपनीने आरोप केला आहे की, Ola ने त्यांचे खास सॉफ्टवेअर चोरले आहे आणि ते OLA नकाशे विकसित करण्यासाठी वापरलं आहे. OLA ने त्यांच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अधिकारांचे उल्लंघन केलं आहे. मात्र, यासंदर्भात Ola ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.MapMyIndia कंपनीने पाठवलेल्या कायदेशीर नोटीस नंतर आता ola वरील डेटा चोरीच्या आरोपांची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर डेटा चोरी सिद्ध झाल्यास Ola वर मोठी कारवाई होऊ शकते आणि Ola ला मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
Ola ने काही दिवसांपूर्वीच Ola Maps ची घोषणा केली होती. OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी मेड फॉर इंडिया आणि प्राईज्ड फॉर इंडिया नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी AI कंपनी Krutrim ने ONDC (Open Network for Digital Commerce) सोबत करार केला आहे. याबाबत OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली होती. भारतीय नवनिर्मितीला मोठी चालना मिळावी, या उद्देशाने OLA मॅप तयार करण्यात आल्याचं भाविश अग्रवाल यांनी सांगितलं होतं. मात्र आता हे OLA मॅप MapMyIndia कंपनीचा डेटा चोरून तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.