नवी दिल्ली : इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्यापैकी अनेक जण ॲक्टिव्ह (Active) असतात आणि सातत्याने स्टोरीज आणि पोस्ट (Posts) करत असतात. इंस्टाग्राम अधिकाधिक युजर्सला कार्यशील ठेवण्यासाठी आणि त्यांना अधिकाधिक उत्तमोत्तम अनुभव देण्यासाठी प्लॅटफॉर्ममध्ये ठाराविक कालांतराने बदलही (Changes) करत असते. इंस्टाग्रामवर लवकरच युजर्सला एक आणखी नवीन बदल अनुभवायला मिळणार आहे जो असा लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे जे संपूर्ण दिवस या प्लॅटफॉर्मवरच पडीक असतात आणि अजिबातही विश्रांती घेत नाहीत. अशा लोकांसाठी Instagram ‘टेक अ ब्रेक’ (Take A Break) नामक फीचरवर काम करत आहे.
असे दिसून आले आहे की, काही लोक इन्स्टाग्रामसह (Instagram) सोशल मीडियाचा (Social Media) अति प्रमाणात वापर करतात. अशा लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी कंपनी लवकरच टेक अ ब्रेक फीचर घेऊन येत आहे. अनेक वेळा लोक हे विसरतात की ते तासनतास इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह (Active On Instagram) आहेत, अशा स्थितीत आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नवीन फीचरची चाचणी (Feature Test) घेतली जात आहे.
[read_also content=”ऑफिस अवर्सनंतर बॉसने इम्प्लॉईंशी संपर्क साधल्यास होणार Penalty, या देशाने केला नवा नियम https://www.navarashtra.com/world/penalties-for-bosses-contacting-employees-after-office-hours-nrvb-201265.html”]
इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांच्या मते, बहुप्रतिक्षित ‘टेक अ ब्रेक’ फीचर वापरकर्त्यांना आठवण करून देईल की त्यांनी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवला आहे. मोसेरीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “तुम्हाला जे वाटते ते ते करते. तुम्ही निवडल्यास, ॲपवर ठराविक वेळ घालवल्यानंतर ते तुम्हाला Instagram मधून ब्रेक घेण्यास प्रोत्साहित करते. “10, 20, किंवा 30 मिनिटे.
[read_also content=”महिलेने नाही दिली सरकारला जमीन , महामार्गाच्या मधोमध कैद झालं घर https://www.navarashtra.com/viral/motorway-haizhuyong-bridge-built-around-tiny-house-after-owner-refuses-to-move-in-guangzhou-china-know-the-story-in-details-nrvb-201048.html”]
नवीन फीचर अशा वेळी आले आहे जेव्हा Instagram त्याच्या किशोरवयीन युजर्ससाठी हानिकारक असल्याची तक्रार केली जात आहे. अलीकडेच अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी उघड केले की लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात.