iPhone 16 Pro Touch Issue: Apple च्या सर्वात प्रीमियम फोनचे युजर्स त्रस्त, टच आणि स्क्रीन लॅगमुळे निर्माण होतात समस्या
काही दिवसांपूर्वीच टेक जायंट कंपनी Apple ने iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. iPhone 16 सिरीज लाँच होताच त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अगदी काहीजण तर iPhone 16 सिरीजच्या खरेदीसाठी 20 ते 22 तास रांगेच उभे होते. मात्र आता iPhone 16 युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. iPhone 16 Pro मध्ये टच आणि स्क्रीन लॅग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
हेदेखील वाचा- OpenAI चं एक्स अकाऊंट झालं हॅक! पोस्ट करत स्कॅमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
Apple iPhone 16 Pro हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप फोन आहे, जो कंपनीने नुकताच लाँच केला आहे. ॲपलच्या या मॉडेलची विक्री काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. आता यूजर्स तक्रार करत आहेत की त्यांना आयफोनमध्ये स्क्रीन लॅग सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगभरातील वापरकर्ते आयफोनच्या या टच प्रतिसादाबद्दल तक्रार करत आहेत. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
iPhone 16 Pro युजर्सचे म्हणणे आहे की त्यांना टॅप करणे आणि स्वाइप करण्यात अडचणी येत आहेत. यासोबतच स्क्रोलिंग, ड्रॅगिंग आणि टायपिंग करतानाही काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही वापरकर्ते असे म्हणतात की व्हर्च्युअल कीबोर्ड वापरताना त्यांना मिस प्रेसची समस्या येत आहे.
हेदेखील वाचा- Telegram updates policies: टेलिग्राम युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनी तुमची माहिती सरकारसोबत करणार शेअर, काय आहे कारण
9To5Mac च्या रिपोर्टनुसार, iPhone मध्ये ही समस्या हार्डवेअर दोषाऐवजी सॉफ्टवेअर बगमुळे होत आहे. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की iOS चा अॅक्सिडेंटल टच रिजेक्शन अल्गोरिदम खूपच संवेदनशील आहे, ज्यामुळे तो अनेक वेळा स्पर्शाकडे दुर्लक्ष करतो. अहवालात असेही म्हटले आहे की, काहीवेळा जेव्हा वापरकर्त्याचा संपर्क स्क्रीनच्या दुसऱ्या भागात असतो, तेव्हा सिस्टमला वाटते की वापरकर्त्याने नकळत त्याला स्पर्श केला आहे, ज्यामुळे हा स्पर्श नाकारला जातो. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जेव्हा त्यांचे बोट कॅमेरा कंट्रोल बटणाजवळ असते तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो. यासह, काही वापरकर्त्यांना असे वाटते की ही समस्या स्क्रीनच्या चारही कडांवर सारखीच आहे.
वापरकर्ते म्हणतात की जेव्हा हे घडते तेव्हा आयफोन सॉफ्टवेअर काही काळ स्क्रीनवरील स्पर्शांकडे दुर्लक्ष करते. यामुळे ते आयफोनवर टॅप किंवा स्वाइप करू शकत नाहीत. आयफोनच्या स्लीक बेझलमुळे अशी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, आयफोन लॉक स्क्रीन किंवा निष्क्रिय असताना ही समस्या उद्भवत नाही. डिव्हाइस अनलॉक केलेले असताना किंवा ॲपवर स्क्रोल करताना, स्वाइप करताना आणि टाइप करताना उद्भवते. वापरकर्त्यांना आशा आहे की ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटसह निश्चित केली जाईल.