OpenAI चं एक्स अकाऊंट झालं हॅक! पोस्ट करत स्कॅमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
OpenAI चे अधिकृत X अकाऊंट @OpenAINewsroom 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी हॅक झाले. क्रिप्टोकरन्सी स्कॅमर्सनी OpenAI चे अधिकृत X अकाऊंट हॅक केल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर त्यांनी अकाऊंटवरून एक पोस्ट देखील शेअर केली आहे, जी पोस्ट स्कॅमला प्रोत्साहन देणारी होती. क्रिप्टोकरन्सी स्कॅमर्सनी OpenAI चे अधिकृत X अकाऊंट हॅक करून “$OPENAI” नावाच्या क्रिप्टोकरन्सी स्कॅमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. OpenAINewsroom या अकाऊंटवर सुमारे 54,000 फॉलोअर्स आहेत. अहवालानुसार हॅक झालेल्या खात्यात 7 वाजताच्या सुमारास बनावट पोस्ट्स दिसल्या.
.@OpenAI @OpenAINewsroom twitter hacked? pic.twitter.com/Z4erandy27
— guy (@flashloanz) September 23, 2024
Damn, @OpenAINewsroom got hacked pic.twitter.com/SvkbiyutAe
— Aleksandr Vasilenko (@vasalex93) September 23, 2024
The @OpenAINewsroom account just got hacked, and it’s actually pretty impressive and convincing (because AI and crypto, what’s the difference right?) pic.twitter.com/JnhMb7Y3QE
— Ben Schoon (@NexusBen) September 23, 2024
स्कॅमर्सनी रात्री अकाऊंट हॅक केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली होती. जी पोस्ट आता हटवण्यात आली आहे. मात्र अनेक एक्स युजर्सनी या पोस्टचा स्क्रीनशॉट त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. स्कॅमर्सनी केलेल्या या पोस्टमध्ये नवीन टोकन लाँच करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. हॅक झाल्यानंतर खात्यातील एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सर्व OpenAI वापरकर्ते $OPENAI च्या सुरुवातीच्या लाँचिंगवरील काही भागावर दावा करण्यास पात्र आहेत आणि $OPENAI टोकनच्या मदतीने भविष्यातील सर्व बीटा प्रोग्राम्समध्ये युजर्सना प्रवेश मिळणार आहे. (फोटो सौजन्य – एक्स अकाऊंट)
स्कॅमर्सनी एक बनावट OpenAI वेबसाइट देखील तयार केली. या बनावट पोस्टमध्ये एक लिंक आहे जी वास्तविक openai.com डोमेनवर नव्हती. बनावट वेबसाइटने वापरकर्त्यांना $OPENAI क्रिप्टोकरन्सीवर दावा करण्याचा पर्याय दिला, परंतु यासाठी वापरकर्त्यांना प्रथम त्यांचे वॉलेट कनेक्ट करणे आवश्यक होते, जो स्कॅमचा भाग होता. OpenAI आणि @OpenAINewsroom अकाऊंट या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते. हे अकाऊंट आता पूर्ववत करण्यात आले आहे, मात्र ही घटना कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्कॅमर्सनी OpenAI चे एक्स अकाऊंट हॅक करण्यासाठी कोणती पध्दत वापरली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र कंपनीने स्कॅमर्सने शेअर केलेली पोस्ट अकाऊंटवरून हटवली आहे. ओपनएआयने सांगितले की त्यांना या समस्येची जाणीव आहे आणि ते त्याकडे लक्ष देत आहे. तसेच युजर्सने कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, कोणत्याही पोस्ट संशयास्पद पोस्टवर विश्वास ठेऊ नये आणि स्कॅमर्सपासून सावध राहावे, असे आवाहन OpenAI ने केलं आहे.
23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास OpenAI चे एक्स अकाऊंट OpenAINewsroom क्रिप्टोकरन्सी स्कॅमर्सनी हॅक केलं. त्यानंतर त्यांनी या अकाऊंटवरून स्कॅमला प्रोत्साहन देणारी एक पोस्ट शेअर केली. ज्या पोस्टमध्ये एक लिंक होती. मात्र या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सना त्यांचं वॉलेट लिंकसोबत कनेक्ट करणं गरजेचं होते. या सर्व घटनांनंतर आता OpenAI ने त्यांच्या अकाऊंटचा परत ताबा मिळवला असून बनावट पोस्ट देखील अकाऊंटवरून हटविण्यात आली आहे.