Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

तुम्हाला देखील फोल्डेबल फोन खरेदी करण्याची इच्छा आहे का? पण आयफोन डुओ खरेदी करणं बजेटबाहेर जातंय? चिंता करू नको. बाजारात असे काही पर्याय उपलब्ध आहेत, जे आयफोन डुओपेक्षा कमी किंमतीत प्रिमियम फोल्डेबल फोन वापरण्याचा अनुभव देतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2026 | 11:11 AM
फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • iPhone Duo ची किंमत 2,99,900 रुपये असून, त्यापेक्षा कमी किंमतीत गुगल, मोटोरोला आणि सॅमसंगचे फोल्डेबल फोन उपलब्ध आहेत.
  • गूगल पिक्सेल 11 प्रो फोल्ड ची सुरुवातीची किंमत 1,86,999 रुपये, तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 ची किंमत 1,84,999 रुपये आहे.
  • मोटोरोला रेझर फोल्ड आणि मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026) हे अनुक्रमे 1,49,999 रुपये आणि सुमारे 1,42,500 रुपयांच्या किंमतीत फोल्डेबल पर्याय देतात.
टेकजायंट कंपनी असलेल्या ॲपलने अलीकडेच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला आहे. हे डिव्हाईस आयफोन डुओ या नावाने लाँच करण्यात आले आहे. 2,99,900 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आलेला हा आयफोन बाजारातील सर्वात महागड्या स्मार्टफोन्सच्या यादीत समाविष्ट झाला आहे. तुम्हाला देखील फोल्डेबल फोन खरेदी करण्याची इच्छा असेल पण तुमचे बजेट कमी असेल तर चिंता करू नका. बाजारात फोल्डेबल फोन्सचे इतर पर्याय देखील उपलब्ध आहेत. हे पर्याय आयफोन डुओ पेक्षा स्वस्त आहेत. यामुळे तुम्ही कमी खर्चात प्रिमियम फोल्डेबल फोन खरेदी करू शकणार आहात.

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

गूगल पिक्सेल 11 प्रो फोल्ड

गूगल पिक्सेल 11 प्रो फोल्ड 1,86,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये टेंसर G6 प्रोसेसर आणि 16GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंच कवर स्क्रीन आणि 8 इंच इनर डिस्प्ले देखील मिळणार आहे. कंपनीने या फोल्डेबल फोनमध्ये स्प्लिट स्क्रीन, ड्रॅग अँड ड्रॉप आणि इंस्टंट व्ह्यु सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, या डिव्हाईसमध्ये पिक्सेल सिरीजचा एआय आणि कॅमेरा फीचर्स देखील मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8

आयफोन डुओसोबत थेट स्पर्धा करणाऱ्यांपैकी एक म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8. याची सुरुवातीची किंमत 1,84,999 रुपये आहे. या फोनमध्ये 5.5 इंच कवर डिस्प्ले आणि 7.6 इंच इनर स्क्रीन मिळणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 4,800mAh बॅटरी दिली आहे. याचे बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाईन मल्टीटास्किंग, अभ्यास आणि व्हिडीओ पाहण्यासाठी मोठी स्क्रीन उपलब्ध करून देते.

मोटोरोला रेझर फोल्ड

मोटोरोला रेझर फोल्डची सुरुवातीची किंमत 1,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही असे स्पेसिफिकेशन्स आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन अतिशय खास ठरतो. या डिव्हाईसमध्ये 6.6 इंच बाहेरील स्क्रीन दिली आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 50MP कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. जास्त मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि कॅमेरा हार्डवेअरची गरज असणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026)

जर तुमचे बजेट आणखी कमी असेल तर तुम्ही मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026) खरेदी करण्याचा विचार करू शकता. याची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच सुमारे 1,42,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिप डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलाईट चिप, 16GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी दिली आहे. याचे कॉम्पॅक्ट डिझाईन दुसऱ्या फोल्डेबल फोनच्या तुलनेत जास्त पोर्टेबल बनवते.

Web Title: Iphone duo alternatives 4 cheaper foldable phones you can buy in your budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • apple
  • google
  • iphone

संबंधित बातम्या

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
1

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
2

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
3

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील
4

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.