iQOO Z9s Series मधील 2 नवे स्मार्टफोन आज होणार लाँच (फोटो सौजन्य - iQOO )
टेक कंपनी iQOO आज आपली नवीनतम सिरीज iQOO Z9s भारतात लाँच करणार आहे. आज 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता iQOO Z9s सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देत लाँचिंग पोस्टर रिलीज केलं आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर देखील iQOO Z9s सिरीजचे चिंग पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. iQOO Z9s सिरीजमध्ये कंपनी iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. दोन्ही फोन अल्ट्रा स्लिम डिझाइनसह लाँच केले जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि Amazon वर लाँच करण्यात आलेले पोस्टर अतिशय आकर्षक आहे.
हेदेखील वाचा- Apple ने सुरु केलं Back to School 2024 कॅपंपैन; कंपनीकडून विद्यार्थ्यांना मिळणार मदत
आकर्षक पोस्टरमुळे आता ग्राहकांची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. आज दुपारी 12 वाजता iQOO Z9s सिरीज अंतर्गत iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले जाणार आहेत. कंपनीचा हा ईव्हेंट त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही फोन वेगवेगळ्या चिपसेटसह आणले जात आहेत. मात्र असे असले तरी iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro या दोन स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरीसह बरेच फीचर्स मिळणार आहेत. चला फोनच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.
iQOO Z9s फोन MediaTek Dimensity 7300 5G चिपसेटसह आणला जात आहे. फोन 4nm TSMCप्रोसेस टेक्नोलॉजीसह आणला जात आहे.
कंपनी iQOO Z9s ला सर्वात वेगवान कर्व्ड स्क्रीन फोन म्हणून लाँच करणार आहे. हा फोन 120hz 3D वक्र AMOLED डिस्प्ले सह येईल.
कंपनीचा नवीन फोन 0.749cm च्या अल्ट्रा स्लिम बॉडीसह आणला जात आहे.
iQOO Z9s स्मार्टफोन टायटॅनियम मॅट आणि Onyx Green या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
फोनमध्ये 50MP Sony IMX882 OIS कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा असेल.
हेदेखील वाचा- Google, Microsoft आणि Adobe सह या टेक कंपन्यांमध्ये आहेत भारतीय सीईओ!
iQOO Z9s फोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली जाणार आहे.
प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 चिपसेट असेल. iQOO Z9s Pro स्मार्टफोन 4nm TSMC प्रोसेस टेक्नोलॉजीसह लाँच होणार आहे.
फोनमध्ये 120hz 3D कर्व्ड डिस्प्ले असेल. फोन 4500 nits पीक ब्राइटनेससह लाँच केला जाईल.
नवीन फोन 0.749cm च्या अल्ट्रा स्लिम बॉडीसह आणला जात आहे.
प्रो मॉडेल 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z9s Pro मॉडेल लक्स मार्बल आणि फ्लॅम्बॉयंट ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
प्रो मॉडेलमध्ये 50MP Sony IMX882 OIS कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.