Google, Microsoft आणि Adobe सह या टेक कंपन्यांमध्ये आहेत भारतीय सीईओ! (फोटो सौजन्य - pinterest)
जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये Google, Microsoft, Adobe, IBM यांसारख्या कंपन्याचा समावेश आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण या टेक कंपन्यांच्या सेवांचा वापर करतो. Google, Microsoft, Adobe शिवाय आपली कामं होणं फार कठीण आहे. आपण दिवसभरातून अनेक वेळा Google चा वापर करतो. Google च्या वापराशिवाय आपला एकही दिवस जाणं कठीण आहे. एखादा प्रश्न किंवा एखाद्या विषावरील माहिती शोधण्यासाठी Google चा वापर केला जातो.
हेदेखील वाचा- Google ने जारी केला अलर्ट! स्कॅमर आणि बनावट ईमेलपासून वाचण्यासाठी दिल्या सूचना
तसेच जगभरातील निम्म्याहून अधिक लॅपटॉप आणि कंम्युटर Microsoft वर अवलंबून आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा Microsoft डाऊनची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जगभरातील अनेक काम ठप्प झाली होती. आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्या टेक कंपन्यांच्या सेवांचा वापर करतो, त्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? ह्या सीईओंची प्रत्येक निर्णयामध्ये फार महत्त्वाची भुमिका असते. थोडक्यात सांगायचं तर, जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये प्रमुख पदांवर भारतीयांचे वर्चस्व आहे.Google, Adobe आणि Microsoft सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये भारतीय लोकं मोठ्या पदांवर काम करत आहेत.
आपण परदेशी कंपन्यांच्या सेवा वापरत असलो तरी त्यामागे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतीयांची भूमिका महत्त्वाची आहे. सुंदर पिचाई यांच्यामुळे Google च्या अनेक प्रमुख सेवा यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली Microsoft ने अनेक टप्पे गाठले आहेत. Google पासून ते तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Microsoft पर्यंत भारतीय वंशाचे लोक सीईओसारख्या मोठ्या पदांवर काम करत आहेत. या कंपन्यांच्या सेवा भारतासह जगभरातील अनेक युजर्सपर्यंत पोहोचतात. या कंपन्यांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यात भारतीय वंशाचे सीईओ महत्त्वाची भूमिका बजावतात याची फार कमी लोकांना माहिती असेल.
हेदेखील वाचा- X अकाऊंटवर लॉगिन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही, लाँच झालं ‘हे’ नवीन फीचर
जगभरातील निम्म्याहून अधिक लॅपटॉप आणि कंम्युटर Microsoft वर अवलंबून आहेत. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतीय वंशाचे सत्या नडेला अनेक वर्षांपासून Microsoft कंपनीचे प्रमुख आहेत. अमेरिकन कंपन्यांमध्ये घेतलेल्या सर्व प्रमुख निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मूळचे हैदराबादचे असलेले नाडेला 2014 मध्ये Microsoft कंपनीत रुजू झाले.
Google ची मूळ कंपनी Alphabet Inc मध्येही भारतीय वंशाचे सीईओ आहेत. आज गुगल ज्या सेवांच्या आधारे अब्जावधी डॉलर कमावते त्या सेवांमध्ये सीईओ सुंदर पिचाई यांची सर्वात मोठी भूमिका आहे. नवीन सेवा येण्यापूर्वी मूलभूत रचना तयार करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पिचाई 2004 पासून Google सोबत काम करत आहेत. पिचाई यांची 10 ऑगस्ट 2015 रोजी Google चे पुढील CEO म्हणून निवड झाली.
Adobe Inc. चे CEO शंतनू नारायण हे देखील भारतीय वंशाचे आहेत. 1998 पासून ते सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीशी संबंधित आहेत. त्याने काही काळ ऍपल आणि सिलिकॉन ग्राफिक्ससाठीही काम केले आहे.
इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (IBM) चे CEO म्हणून कार्यरत असलेले अरविंद कृष्णा देखील भारतीय आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. IBM ला पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जगातील सर्वात मोठ्या सेमीकंडक्टर कंपन्यांपैकी एक आणि अमेरिकन मेमरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असलेल्या Micron Technology चे सीईओ संजय मेहरोत्रा देखील भारतीय आहेत. कंपनी डायनॅमिक ॲक्सेस मेमरी, फ्लॅश मेमरी आणि USB फ्लॅश ड्राइव्हसह संगणक मेमरी आणि संगणक डेटा स्टोरेजशी संबंधित आहे.