पेजर ब्लास्टच्या घटनेनंतर Motorola च्या अडचणी वाढल्या; या देशाने बॅन केले सर्व फोन
दोन महिन्यांपूर्वी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागात पेजरचे ब्लास्ट झाले. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून 4000 हून अधिक लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पेजर हॅक करून लेबनॉन आणि सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या काही भागात ब्लास्ट करण्यात आले. पेजरच्या वापरामुळे आता टेक कंपनी मोटोरोलाच्या अडचणी वाढल्या आहेत. लेबनॉनमधील पेजर स्फोटाच्या घटनांनंतर इराणने मोटोरोला मोबाईल फोनवर बंदी घातली आहे.
हेदेखील वाचा- स्मार्टफोनच्या जगात या देशांमध्ये आजही केला जातो पेजरचा वापर! वाचा संपूर्ण यादी
पेजरमध्ये स्फोट झाल्याने हिजबुल्लाह सदस्यांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेत आता ईराणमध्ये मोटोरोला मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेबनॉनमध्ये पेजर स्फोटात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या पेजर्समध्ये स्फोटके पेरण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर इराण सरकारने मोटोरोला मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. मोटोरोला फोनचा वापर करून अशा प्रकारचा प्रकार पुन्हा घडू शकतो, असा इराण सरकारला विश्वास आहे. याच घटनेमुळे मोटोरोला मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
देशाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयाचा इराणच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. आता या निर्णयावर इतर देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता अशा घटना रोखण्यासाठी इराण सरकार काय पावले उचलते हेही पाहावे लागेल. इराण सरकारच्या या निर्णयामुळे सुरक्षा, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेदेखील वाचा- सक्सेसफुल सोशल मिडीया इन्फ्लुएंसर बनायच आहे? या सोप्या टीप्स फॉलो करून तुम्ही सुध्दा व्हाल फेमस
बेस स्टेशन किंवा सेंट्रल डिस्पॅचवरून रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे संदेश प्राप्त करण्यासाठी बहुतेक लोक पेजर वापरतात. हे संदेश संख्यात्मक असू शकतात, जसे की फोन नंबर किंवा अल्फान्यूमेरिक, जसे की मजकूर. संदेश पाठवण्यासाठी टू-वे पेजर वापरतात. मेसेज आला की पेजर टोन वाजतो. पेजर मोबाईल नेटवर्कवर अवलंबून नाही. त्यामुळे ते संवादाचे विश्वसनीय साधन मानले जाते. कठीण परिस्थितीत, इतरांना संदेश पोहोचविण्यात पेजर उपयुक्त ठरते.
अमेरिका, जपान, ब्रिटन, कॅनडा, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांमध्ये पेजरचा वापर केला जातो. हे रुग्णालय आणि आरोग्य सेवा क्षेत्रात वापरले जाते. मात्र, त्यांची संख्या खूपच कमी आहे. ज्या देशांमध्ये इंटरनेट कव्हरेज खूपच खराब आहे अशा देशांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. पूर्वी पेजर भारतासह जगभरात लोकप्रिय होते.
पेजरची बॅटरी मजबूत आहे. हे एकदा चार्ज केल्यावर संपूर्ण आठवडा चालते. हे मोबाईलपेक्षा वेगाने संदेश पाठवते. पेजरचे दोन प्रकार आहेत. वन-वे पेजर आणि टू-वे पेजर. वन-वे-पेजरमध्ये वापरकर्ते केवळ संदेश प्राप्त करू शकत होते, परंतु उत्तर देऊ शकत नव्हते. टू-वे पेजरमध्ये, संदेश प्राप्त करण्याबरोबरच, उत्तर देखील पाठविले जाऊ शकते.