तुम्हाला तुमच्या मोबाईलचे रेडिएशन माहित आहे का? अशा पद्धतीने चेक करा आणि जीवघेणे आजार टाळा
मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. मोबाईलशिवाय आपण एका दिवसाची सुध्दा कल्पना करू शकत नाही. आपली सर्व कामं मोबाईलच्या मदतीने होत असल्यामुळे आपल्या हातात सतत मोबाईल असण गरजेचं असतं. इतकचं काय तर आपण झोपताना देखील आपल्या जवळ मोबाईल ठेवतो. मोबाईल सतत जवळ ठेवल्याने त्याच्या रेडिएशनचे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे मोबाईल फोनच्या रेडिएशनबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
हेदेखील वाचा- फेक रिव्ह्यूपासून युजर्सची होणार सुटका, Google Maps ने लाँच केल नवं फीचर
सध्याच्या डिजीटल जगात आणि धावपळीच्या जीवनात मोबाईल फोन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण मोबाईल फोनशिवाय एक मिनिटही जगू शकत नाही. पण सतत आपल्या सोबत असणाऱ्या मोबाईल फोनच्या रेडिएशनचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. मोबाईल फोनच्या रेडिएशनचा पर्यावरणात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांवरसुध्दा वाईट परिणाम होतो. त्यामुळे मोबाईल रेडिएशनपासून दूर राहण गरजेचं आहे. पण आपल्या फोनचे रेडिएशन किती आहे, हे कसं ओळखणार असा प्रश्न आता उपस्थित होतो. ह्याच प्रश्नाचं उत्तर आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
वास्तविक, आपण वापरत असलेले मोबाइल फोन एका विशिष्ट प्रकारच्या लहरी (इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन) निर्माण करतात, ज्या सामान्य जीवनासाठी हानिकारक मानल्या जातात. मोबाईल रेडिएशनमुळे मानसिक नैराश्यासह अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे रेडिएशन तपासायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून *#07# डायल करावे लागेल. हा नंबर डायल करताच मोबाईल स्क्रीनवर रेडिएशनशी संबंधित माहिती दिसेल. यामध्ये रेडिएशनची पातळी दोन प्रकारे दाखवली जाते. एक म्हणजे ‘हेड’ आणि दुसरे ‘बॉडी’. फोनवर बोलत असताना मोबाईलच्या रेडिएशनची पातळी काय असते आणि फोन वापरताना किंवा खिशात ठेवताना शरीरावर रेडिएशनची पातळी किती असते? जाणून घेऊया.
दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘स्पेसिफिक एब्जॉर्प्शन रेट’ (SAR) नुसार, कोणत्याही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर स्मार्ट उपकरणांचे रेडिएशन 1.6 वॅट्स प्रति किलोग्रामपेक्षा जास्त नसावे. हा नियम शरीरापासून डिव्हाइसच्या 10 मिलीमीटरच्या अंतरावर देखील लागू होतो. फोनवर बोलताना किंवा खिशात ठेवताना तुमचे डिव्हाइस रेडिएशनची ही मर्यादा ओलांडत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, डिवाइस रेडिएशनपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही, परंतु काही काळ यापासून निश्चितपणे संरक्षण केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, फोन चार्ज करताना कधीही फोनवर बोलू नका. यावेळी मोबाईल रेडिएशन 10 पटीने वाढते. सिग्नल कमकुवत असताना किंवा बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर कॉल करू नका. या काळात रेडिएशन पातळीही वाढते. आवश्यक असल्यास इअरफोन किंवा हेडफोन वापरा. त्यामुळे शरीरावरील रेडिएशनचा प्रभाव कमी होतो. भारताच्या नॅशनल स्पेसिफिक ऍब्सॉर्प्शन रेट लिमिट (INSARL) नुसार, मोबाईलचे रेडिएशन स्टँडर्ड जास्तीत जास्त 1.6 वॅट्स प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त नसावे.