कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल
गुगल काही दिवसांपूर्वीच कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) करणाऱ्या थर्ड पार्टी अॅप्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. त्यामुळे अँड्रॉइड फोन (Android Phone) मध्ये कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करणे शक्य नाही. यासाठी फोनमध्ये देण्यात आलेल्या इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचरचाच वापर करावा लागतो. मात्र, अनेकदा असे होते की समोरील व्यक्ती आपल्या कॉलला रेकॉर्ड करत असते व आपल्याला याबाबत समजत देखील नाही. परंतु, काही सोप्या ट्रिकच्या मदतीने तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना हे तुम्ही तपासू शकता.
कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आम्ही काही टिप्स देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला समजणे सोपे होईल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कॉल रेकॉर्डिंगच्या फिचरपासून तुम्ही स्वत:चे संरक्षण कसे करू शकता? तसेच, हे फिचर कसे कार्य करते? तुम्हीही या चुका करू नका. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – 1 डिसेंबरपूर्वी पेन्शनधारकांनी ही कागदपत्रे जमा करावी, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद! जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस
पहिले देतो नॉटिफिकेशन
कॉलिंगचे एक फिचर असे आहे, ज्यामध्ये युजर्सना पहिलेच एक नॉटिफिकेशन दिली जाते. कॉल रेकॉर्ड होत असल्यास, त्यांना याबाबत पहिलेच माहिती दिली जाते. त्यामुळे या चुकांकडेही दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही नोटिफिकेशन येत असेल तर त्वरित याकडे लक्ष द्या आणि याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे रेकॉर्डिंग सुरू झाले आहे हे तुम्हाला लगेच समजले पाहिजे. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे करणे खूप महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हीही ताबडतोब सतर्क झाले पाहिजे.
हेदेखील वाचा – सॅटलाइट इंटरनेट बनेल ‘मॅजिक बुलेट’! Airtel’ने केली तयारी, इंटरनेट स्पीड बनवणार नवीन विक्रम
कॉल रेकॉर्डिंग
कॉल रेकॉर्डिंग भारतात गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही. तर असे अनेक देश आहेत जिथे कॉल रेकॉर्डिंग गुन्ह्याच्या श्रेणीत येते. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जे नंतर दिसून येते. हे अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे तुम्हीही अशा चुका करू नये. कॉल रेकॉर्ड करताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. एका चुकीमुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते.