सध्याच्या स्मार्टफोनच्या दुनियेत इंटरनेट फार मोठी कामगिरी बजावतं. आपल्या प्रत्येक कामासाठी आपल्याला इंटरनेटची गरज भासते अशात प्रत्येकजण चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या इंटरनेटच्या शोधात आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्येही याबाबत मोठी स्पर्धा सुरु आहे. आपल्या हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीने कंपन्या युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान याबाबाच आता नवीन अपडेट समोर आली आहे.
मागील अनेक दिवसांपासून सॅटेलाइट नेटवर्कबाबत चर्चा होत आहे. याबाबत जिओ आणि एअरटेल यांच्यात थेट स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. आता एअरटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल (Sunil Mittal)यांनी सॅटेलाइट इंटरनेटचे वर्णन मॅजिक बुलेट असे केले आहे. ते म्हणतात की, याच्या मदतीने आम्ही अशा क्षेत्रांना देखील जोडू शकतो जिथे नेटवर्कची उपस्थिती नाही. खेळाडूंना सॅटलाइट कनेक्टिव्हिटीसाठी विशेष उपलब्ध होत
संधी आहे.
हेदेखील वाचा – तुमच्या स्मार्टफोनची Battery Health जरूर चेक करा, हा आहे सोपा मार्ग
मित्तल म्हणाले, ‘सुमारे 2 अब्ज लोकांकडे अजूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. भारताच्या बाबतीतही हेच दिसून येते. वनक्षेत्र आणि किनारपट्टीवरील लोकांकडे मोबाईल नेटवर्क किंवा फायबर कनेक्टिव्हिटी नाही. अशा क्षेत्रांना जोडण्यात सॅटेलाइट नेटवर्क महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सॅटलाइट नेटवर्क आमच्यासाठी नवीन संधी निर्माण करेल. टेलिकॉम ऑपरेटर त्याच्या मदतीने सर्व नेटवर्क क्षेत्रे कव्हर करतील.
भारतातील 25 टक्के भागात राहणाऱ्या लोकांना चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोकांना इंटरनेट उपलब्ध नाही. अशा लोकांसाठी सॅटेलाइट हा एकमेव उपाय आहे. भारत आपल्या नागरिकांना अतिशय जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी देत आहे. एकूण लोकसंख्येपैकी 95 टक्के लोकांना हाय कॉलीटी सिग्नल मिळतात. कमी लोकसंख्येसह हा खूप मोठा एरिया आहे ज्याला चांगल्या कॉलीटीचे इंटरनेट मिळत नाही.
हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपवर ट्रॅफिक चलन उपलब्ध होणार, जाणून घ्या कसे होईल पेमेंट?
देशातील एकही कोपरा सोडणार नाही
सुनील मित्तल म्हणाले, ‘गुजरातमध्ये दोन ग्राउंड स्टेशन आणि पुद्दुचेरीमध्ये एक ग्राउंड स्टेशनही तयार आहेत. आमची तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच आमच्याकडून ही सेवा सुरू केली जणार आहे. सरकारकडून परवानगी मिळताच आम्ही देशातील एकही कोपरा सोडणार नाही जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल. तुम्हाला फक्त तुमचा हात वर करावा लागेल आणि तुमचा फोन कनेक्ट होईल.