
फोटो सौजन्य - Social Media
भारतीय ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी लावा इंटरनॅशनलने आपल्या प्रो (Pro) सिरीजचा विस्तार करत तीन नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने Probuds T51 ट्रू वायरलेस इयरबड्स, Xscape 13° नेकबँड आणि Prowatt Air 10K पॉवर बँक लॉन्च केली आहे. प्रीमियम फीचर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत. ऑडिओ आणि पॉवर अॅक्सेसरीजच्या श्रेणीत कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
लावाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रॉडक्ट प्रमुख सुमित सिंह यांनी सांगितले की, भारतीय तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन प्रो सिरीज विकसित करण्यात आली आहे. टिकाऊपणा, सुरक्षितता आणि आकर्षक डिझाइन या तत्त्वांवर ही उत्पादने तयार करण्यात आली असून, 2026 मध्ये ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा अधिक व्यापक पोर्टफोलिओ ग्राहकांसमोर आणण्यावर कंपनीचा भर राहणार आहे.
Probuds T51 ची किंमत 1,999 रुपये असून, यात 50dB Hybrid Active Noise Cancellation (ANC), 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, 60 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप, Bluetooth 5.4, ड्युअल डिव्हाइस पेअरिंग, इन-इअर डिटेक्शन, IPX4 वॉटर रेसिस्टन्स आणि ProSpot अॅप सपोर्टसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 3 तासांचा प्लेबॅक मिळतो. हे इयरबड्स रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असून लवकरच Amazon वरही विक्रीसाठी येणार आहेत.
Xscape 13° नेकबँड ची किंमत 699 रुपये आहे. यात 70 तासांपर्यंत बॅटरी, तीन EQ मोड्स (Pro Bass, Pro Rock आणि Pro Balance), 40ms लो-लेटन्सी मोड, 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, Bluetooth 5.4, ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि IPX4 रेटिंग देण्यात आले आहे. हा नेकबँडही रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असून लवकरच Amazon वर उपलब्ध होणार आहे.
याशिवाय कंपनीने Prowatt Air 10K पॉवर बँकही लॉन्च केली आहे. 10,000mAh क्षमतेची ही पॉवर बँक 22.5W फास्ट चार्जिंग, डिजिटल बॅटरी डिस्प्ले, अँटी-हीटिंग तंत्रज्ञान, तीन आउटपुट पोर्ट्स आणि स्क्रॅच-रेझिस्टंट फिनिशसह येते. याचे वजन सुमारे 168 ग्रॅम आहे. Amazon Prime सदस्यांसाठी 2 आणि 3 जुलै रोजी ही पॉवर बँक 1,249 रुपयांच्या विशेष लॉन्च किमतीत उपलब्ध असेल, तर नियमित किंमत 1,399 रुपये आहे.
आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’
कंपनीने सांगितले की, तिन्ही उत्पादनांसोबत 1 वर्ष + 2 महिन्यांची विस्तारित वॉरंटी आणि Over-the-Counter Replacement (OTCR) सेवा दिली जाणार आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार ऑडिओ आणि पॉवर अॅक्सेसरीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे लावाने स्पष्ट केले आहे.