iPhone 9 आणि Windows 9 का नाही? मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलने सांगितले 9 नंबर स्किप करण्याचे कारण
ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या अशा दोन दिग्गज कंपन्या आहेत, ज्यांच्याशिवाय संपूर्ण तंत्रज्ञान उद्योग अपूर्ण आहे. अनेक दशकांपासून, या दोन टेक दिग्गजांनी सतत नवनवीन शोध लावून मार्केटमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकनासाठी नेहमीच नवनवीन सेवा आणण्याच्या तयारीत असते. कंपन्या, दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी नवीनतम प्राडक्टस आणि सेवा लाँच करत असतात. त्यांच्या इव्हेंट्स आणि प्रोडक्टस लाँचसाठी अनेक लाखो लोक उत्सुक असतात.
जर तुम्हालाही त्यांच्या प्रोडक्टसविषयी माहिती असेल किंवा तुम्ही त्यांचा वापर करत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, आयफोन निर्माता ॲपल आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट या दोघांनीही आपल्या सिरीजमधून 9 क्रमांक वगळला आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 9 किंवा ॲपलने आयफोन 9 आजवर कधीच सादर केला नाही. दोघांनी 8 व्या सिरीजनंतर विंडोज 10 आणि ॲपल X लाँच केले. मात्र त्यांनी असे का केले असावे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा –Flipkart Big Billion Days Sale: 20 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळेल iPad, कंपनीने दिली माहिती
ॲपलने iPhone 8 नंतर iPhone 9 लाँच न करता ॲपलच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त iPhone X लाँच केले. तर आपल्या दहाव्या वर्धापनानिमित्त त्यांनी आपले ‘Xth’मॉडेल लाँच करण्याचा निर्णय घेतला. आता iPhone 9 च्या ऐवजी iPhone X नावाचा फोन लाँच होणे ही गोष्ट अनेकांसाठी गोंधळात टाकणारी होती.
एवढेच नाही तर ॲपलला आपल्या आपल्या प्रोडक्ट डिजाइनचीदेखील नवीन सुरुवात सूचित करायची होती. त्याचप्रमाणे असे मानले जाते की, नंबर 13 प्रमाणेच नंबर 9 देखील अनेक संस्कृतींमध्ये अशुभ मानले जाते. यासोबतच काही देशांमध्ये तर 9 क्रमांकाचे कधीही स्वागत केले जात नाही. आशियाई भाषांमध्ये याचा नकारात्मक अर्थ होतो. एका भाषांतरामध्ये चिनी भाषेत शाब्दिक शाप आणि जपानमध्ये वेदना असा याचा अर्थ होतो.
हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपची ही सेटिंग अडचणीच्या वेळी येईल कामी, प्रियजनांना मिळत राहील प्रत्येक क्षणाची माहिती
विंडोज 9 हा गोंधळ म्हणून सर्वत्र प्रचलित झाला होता. विंडीजच्या या सीरिजवर झालेल्या बदलांमुळे यावर बरीच टीका करण्यात आली. म्हणूनच यानंतर बदलाचे प्रतीक म्हणून मायक्रोसॉफ्टने पुढील आगामी विंडीज रिलीज हा शेवटचा प्रमुख अपडेट असेल, असे सूचित करण्याचा निर्णय घेतला. शिवाय पूर्वी विंडोज 95 आणि 98 देखील होते त्यामुळे अशाच विंडोज 9 गोंधळ आणि कोड ओव्हरलॅप झाला असावा. या सर्व कारणामुळेच मायक्रोसॉफ्टने 2015 मध्ये विंडोज 10 लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि लाँच देखील केले.