Jio 8th anniversary Offer: मुकेश अंबानी देत आहेत Free Data आणि OTT, आता वर्षभर दाबून वापरता येईल इंटरनेट
रिलायन्स जिओने आपल्या मोबाईल यूजर्ससाठी काही खास ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने आपल्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त काही ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर काही दिवसांसाठी आहेत आणि फक्त निवडक रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असतील. तुम्ही जिओ युजर्स असाल आणि तुम्ही 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान रिचार्ज केल्यास तुम्हाला 700 रुपयांचा फायदा मिळेल. लक्षात ठेवा, ही ऑफर केवळ 899 आणि 999 रुपयांच्या तीन महिन्यांच्या प्लॅनवर आणि 3599 रुपयांच्या एका वर्षाच्या प्लॅनवर उपलब्ध असेल. चला तर या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घ्या.
निवडलेल्या प्लॅनमधून रिचार्ज करणाऱ्या युजर्सना अवघ्या 700 रुपयांचा फायदा मिळणार आहे. यामध्ये 10 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन आणि 10GB डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल, ज्याची किंमत 175 रुपये आहे. याशिवाय जिओ युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता 3 महिन्यांसाठी झोमॅटो गोल्ड मेंबरशिप मिळेल. तसेच, AJIO वर 2999 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या खरेदीवर तुम्हाला 500 रुपयांचे व्हाउचर देखील मिळेल.
हेदेखील वाचा – आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा
हा प्लॅन 899 रुपयांचा आहे आणि 3 महिन्यांसाठी चालतो. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतात. हे दररोज 2GB डेटा देखील प्रदान करते, जे 3 महिने चालेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.
जिओचा 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवस चालतो. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतात. हे दररोज 2GB डेटा देखील प्रदान करते, जे 98 दिवस चालेल. या प्लॅनमधून तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.
हेदेखील वाचा – तुमचा स्मार्टफोन चार्जर खरा आहे खोटा? सरकारी ॲपच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
जिओचा 3,599 रुपयांचा प्लॅन 356 दिवसांसाठी आहे. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतात. हे दररोज 2.5GB डेटा देखील प्रदान करते, जे 356 दिवस चालेल. या प्लॅनमधून तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.