Netflix ने घेतला मोठा निर्णय! युजर्सना दिला मोठा झटका, 'या' डिव्हाइसमधील स्ट्रिमिंग केलं बंद
तुम्ही जर तुमचे आवडते शो किंवा सिरीज बघण्यासाठी Netflix चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अनेक डिव्हाइसवरील त्यांचा सपोर्ट बंद केला आहे. या डिव्हाइसची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये देण्यात आलेल्या डिव्हाइसवर आता Netflix वापरता येणार नाही. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा-UPI चा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या! अन्यथा होईल मोठं नुकसान
भारतातील अनेकजण त्यांचे आवडते शो किंवा सिरीज पाहण्यासाठी Netflix चा वापर करतात. कारण Netflix वर फॅमिली आणि मित्रांसोबत पाहण्यासारख्या अनेक सिरीज उपबल्ध आहेत. त्यामुळे अनेकांच्या विकेंडच्या प्लॅनमध्ये Netflix चा समावेश असतो. भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Netflix ने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. Netflix ने iPhones वर त्यांचा सपोर्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता iPhones युजर्स त्यांच्या फोनमध्ये Netflix चा वापर करू शकणार नाहीत. Netflix च्या या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
नेटफ्लिक्स संबंधी हे मोठे अपडेट iPhones वापरकर्त्यांसाठी आहे. कंपनीने अनेक iPhones वर आपला सपोर्ट बंद केला आहे. अशा परिस्थितीत लाखो iPhones वापरकर्त्यांना आता समस्यांना सामोरे जावे लागू शकते. Netflix यापुढे काही iPhones मॉडेल्सवर चालू शकणार नाही. एका वेबसाईटने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Netflix ने निर्णय घेतला आहे की आता iOS 16 आणि iPadOS 16 ला ॲपचा सपोर्ट मिळणार नाही. याचा अर्थ Netflix ज्या iPhones iOS 17 वर अपग्रेड केले जाऊ शकत नाहीत त्यावर चालू शकणार नाही.
हेदेखील वाचा- Infinix Zero 40 VS Nothing Phone 2a Plus: Infinix की nothing कोणता फोन देणार पैसेवसुल फिचर्स
iOS डिव्हाइसेस यापुढे Netflix चालवण्यास सक्षम नसतील, त्यात iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone X, Apple चा फर्स्ट जनरेशन iPad Pro आणि iPad 5 यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे यापैकी कोणतेही डिव्हाइस असल्यास, याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही त्यावर लोकप्रिय OTT स्ट्रीमिंग ॲपचा आनंद घेऊ शकणार नाही.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखादी कंपनी जुन्या उपकरणांमध्ये सपोर्ट बंद करत आहे. Netflix प्रमाणे WhatsApp नेही अनेकदा अशी पावले उचलली आहेत. WhatsApp बऱ्याचदा जुन्या Android आणि iOS डिव्हाइसेसना सपोर्ट करणे थांबवते. प्रायव्हसी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कंपन्या अनेकदा अशी पावले उचलतात.
एखादा फोन लाँच केल्यानंतर कंपनी काही वर्षांनी त्या फोनसाठी सिक्युरिटी अपडेट लाँच करणं थांबवते. त्यामुळे त्यामुळे अशा डिव्हाइसवरील युजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ज्या फोन्ससाठी सिक्युरिटी अपडेट लाँच करणं थांबवलं जातं, असे डिव्हाइस हॅक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अनेक कंपन्या अशा फोन्समध्ये आपला सपोर्ट थांबवतात.