UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. ऑनलाईन पेमेंटच्या या मोडने देशात डिजिटल व्यवहार वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. UPI द्वारे तुम्ही कोणालाही सहज पैसे पाठवू शकता. UPI चे अनलिमिटेड फायदे आहेत, यात काही शंकाच नाही. पण फायद्यांसोबतच त्याचे नुकसान देखील आहे. UPI पेमेंट मोडमध्ये स्कॅमर नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा नागरिक स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात, ज्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. UPI पेमेंट करताना काही सामान्य गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकण्यापासून तुमची सुटका होईल.
UPI चा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या! अन्यथा होईल मोठं नुकसान (फोटो सौजन्य- pinterest)
तुम्ही UPI वापरत असाल तर स्कॅमर अनेकदा कॉल करून लकी ड्रॉ ऑफर करतात. स्कॅमर विजयी बक्षीस रक्कम हस्तांतरित करण्यासाठी UPI पिन मागतात. अनेक लोक हीच चूक करतात. वास्तविक, UPI द्वारे पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही ॲपमध्ये पिन टाकण्याची गरज नाही.
पण पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये UPI पिन टाकावा लागेल. तुम्ही चुकून तुमचा UPI पिन कुणासोबत शेअर केल्यास पैसे मिळण्याऐवजी तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.
स्कॅमर अनेकदा फोन कॉल करतात आणि म्हणतात की पैसे चुकून तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि रक्कम खूप मोठी असू शकते. अशा परिस्थितीत, जर कोणी पैसे परत पाठवण्यास सांगितले आणि काही आपत्कालीन परिस्थितीचा उल्लेख केला, तर तो घोटाळा असू शकतो.
अशा परिस्थितीत, प्रथम तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट तपासावे लागेल की त्यात पैसे आले आहेत की नाही. अनेक प्रकरणांमध्ये, स्कॅमर पैसे घेण्यासाठी खोटे एसएमएस पाठवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात.
अनेक वेळा पेमेंटसाठी बनावट QR वापरला जातो, अशा परिस्थितीत स्कॅमर तुम्हाला फोन डिस्प्लेवर व्यवहाराचा बनावट संदेश दाखवू शकतात, तर प्रत्यक्षात पैसे अकाऊंटमध्ये येत नाहीत. अशा परिस्थितीत, नेहमी तुमचे बँक अकाऊंट तपासा की पाठवणाऱ्याला पैसे मिळाले आहेत की नाही.
अनेक वेळा पेमेंटसाठी बनावट QR वापरला जातो, अशा परिस्थितीत स्कॅमर तुम्हाला फोन डिस्प्लेवर व्यवहाराचा बनावट संदेश दाखवू शकतात, तर प्रत्यक्षात पैसे अकाऊंटमध्ये येत नाहीत. अशा परिस्थितीत, नेहमी तुमचे बँक अकाऊंट तपासा की पाठवणाऱ्याला पैसे मिळाले आहेत की नाही.