फोटो सौजन्य -iStock
WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट घेऊन येतो. ज्यामुळे WhatsApp वापरताना युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. आता पुन्हा एकदा WhatsApp ने त्यांच्या युजर्साठी एक खास फीचर लाँच केलं आहे. Context कार्ड असं या फीचरचा नाव आहे. हे फीचर केवळ WhatsApp ग्रुपसाठी देण्यात आलं आहे. एखाद्या नवीन मेंबरने WhatsApp ग्रुप जॉईन केल्यास त्याला Context कार्डचा पर्याय देण्यात येणार आहे. या Context कार्डव्दारे त्या नवीन मेंबरला ग्रुपबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अनेकदा काही अनोळखी लोकं आपल्याला एखाद्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करतात. त्यानंतर आपल्याला त्या ग्रुप विषयी आणि ग्रुपमधील इतर मेंबरविषयी माहिती शोधावी लागते. यामध्ये खूप वेळ वाया जातो. पण आता WhatsApp ग्रुप जॉईन झालेल्या प्रत्येक नवीन मेंबरला Context कार्डचा पर्याय देण्यात येणार आहे. Context कार्डव्दारे तुम्हाला ग्रुपबद्दल आणि ग्रुपमधील सर्व सदस्यांबाबत अगदी सहज माहिती उपलब्ध होणार आहे.
Context कार्ड या फीचरमुळे नवीन मेंबरला एका क्लिकवर ग्रुप आणि त्यात आधीपासून उपस्थित असलेल्या लोकांची सर्व माहिती मिळेल. ग्रुपमध्ये नवीन मेंबर ॲड होताच त्याला कॉन्टेक्स्ट कार्ड दाखवले जाईल. यामध्ये तुम्हाला ग्रुपची माहिती, ग्रुपचे नियम आणि ग्रुपशी संबंधित इतर सर्व माहिती मिळेल. नवीन मेंबरला Context कार्ड फीचरद्वारे मागील मेसेजचा सारांश देखील मिळेल. यावरून ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याची कल्पना नवीन मेंबरला मिळेल.
WhatsApp वर यूजर्स अनेक नवीन ग्रुप तयार करत असतात. कॉलेजचा ग्रुप, ऑफिस ग्रुप, फॅमिली मेंबर्स ग्रुप, असे अनेक ग्रुप्स प्रत्येकाच्या WhatsApp वर पाहायला मिळतात. या सर्व ग्रुपमध्ये वेळोवेळी नवीन लोक असतात. पण ॲड झाल्यानंतर नवीन मेंबरला ग्रुप आणि ग्रुप सदस्यांची कोणतीही माहिती नसते. अशावेळी Context कार्ड फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
WhatsApp ने काही दिवसांपूर्वी युजर्ससाठी Events in Groups फीचर लाँच केलं आहे. WhatsApp Events द्वारे तयार करण्यात आलेल्या मॅसेज कॅलेंडरच्या इन्वाइट्ससारखा असणार आहे. या मॅसेजमध्ये तुम्हाला तारीख, वेळ आणि ठिकाण यांसारखी माहिती देता येणार आहे. तसेच तुम्ही ग्रुपच्या इतर सदस्यांना इव्हेंटसाठी व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलसाठी देखील सूचित करू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये हे चॅट पीन करून ठेऊ शकता. ज्यामुळे ग्रुपमधील सदस्यांना वारंवार कॉलसाठी सूचित करावं लागणार नाही.