New Telecom Rules: Jio, Airtel आणि Vi युजर्स लक्ष द्या! TRAI ने वाढवली OTP ची डेडलाइन, या दिवशी लागू होणार नवे नियम
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरसंचार ऑपरेटर्सना एक महिन्याची मुदत देऊन दिलासा दिला आहे. ट्रायने जारी केलेल्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना 1 नोव्हेंबरपासून वापरकर्त्यांना पाठवलेले सर्व व्यावसायिक संदेश ट्रेस करावे लागणार होते. ज्यामुळे वापरकर्त्यांना संदेशांमध्ये कोणत्याही प्रकारची फिशिंग लिंक मिळू नये. या संदेशांमध्ये वन-टाइम पासवर्ड (OTP) देखील समाविष्ट होता. हे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार होते. मात्र आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायचे हे नवे नियम 1 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत.
हेदेखील वाचा- TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता ‘या’ दिवसापासून लागू होणार नवीन नियम
ट्राय आता नवे नियम लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना आणखी एका महिन्याची मुदत देणार आहे. स्पॅम आणि फिशिंग सारख्या अॅक्टिव्हिटीजना आळा घालण्यासाठी ट्रायने हा निर्णय घेतला आहे. या निर्णय टेलिकॉम कंपन्यांसोबतच Jio, Airtel आणि Vi युजर्ससाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ट्रायने जारी केलेल्या नवीन मुदतीनुसार, जर ट्रेसेबिलिटी मॅनडेटद्वारे मॅसेज कंफर्म झाला नाही तर 1 डिसेंबरपासून असे मॅसेज ब्लॉक केले जातील. यापूर्वी ही मुदत 1 नोव्हेंबरपर्यंत होती. देशातील प्रमुख दूरसंचार ऑपरेटर – Airtel, Vodafone-Idea आणि Reliance Jio – यांनी ट्रेसेबिलिटी नियमांचे पालन न करणारे संदेश ब्लॉक केल्यामुळे वापरकर्त्यांना येणाऱ्या संभाव्य समस्यांबद्दल ट्रायकडे त्यांचे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की, बँका तसेच टेलिमार्केटिंग कंपन्या आणि व्यवसाय सध्या यासाठी तयार नाहीत. यासाठी त्यांनी ट्रायकडे आणखी काही कालावधी मागितला आहे.
Airtel, Vodafone-Idea आणि Reliance Jio देखील दररोज याबाबत चेतावणी देत आहेत. या समस्या कमी करण्यासाठी ट्रायने कंपन्यांना स्टेज बाय स्टेज अंमलबजावणी प्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. आता टेलिकॉम कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत बँका, टेलिमार्केटिंग कंपन्या आणि इतर व्यवसायांना दररोज चेतावणी देणार आहेत. यानंतर ट्रायच्या नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या मॅसेजवर 1 डिसेंबरपासून बंदी घालण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा- TRAI च्या नावे केले जात आहेत फ्रॉड कॉल्स; टेलिकॉम अधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
स्पॅम लिंक्स असलेल्या मॅसेजवर बंदी घालणारा हा नियम यापूर्वी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार होता. नंतर ही मुदत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ट्रायने कंपन्यांना आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. ट्रायने दुसऱ्यांदा यासाठी कंपन्यांना वेळ दिला आहे. याआधी, व्हाइट लिस्टमध्ये URL आणि OTT लिंक असलेले संदेश जोडण्याची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
दूरसंचार क्षेत्रातील स्पॅम रोखण्यासाठी आणि वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी, TRAI संस्थांना ब्लॅकलिस्ट करत आहे, मोबाइल नंबर डिस्कनेक्ट करत आहे आणि टेलीमार्केटिंग कॉल्स ब्लॉकचेन-आधारित प्लॅटफॉर्मवर हस्तांतरित करत आहे. ट्रायने घेतलेल्या या निर्णयामुळे मोबाईल युजर्सची सुरक्षा वाढणार असून त्यांची स्पॅम लिंकपासून सुटका होणार आहे. हा निर्णय मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.