एकाचवेळी चार्ज होणार स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच! OnePlus घेऊन आला युजर्सच्या समस्येचं समाधान, 2-इन-1 SUPERVOOC चार्जिंग केबल लाँच..
लोकप्रिय टेक कंपनी OnePlus नेहमीच युजर्ससाठी अनोखे डिव्हाईस लाँच करत असते. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक अनोखी चार्जिंग केबल लाँच केली आहे. सध्याच्या काळात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे दोन डिव्हाईस म्हणजेच स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच. पण अनेकदा असं होतं की स्मार्टफोन चार्ज करताना स्मार्टवॉच चार्ज करायचं राहून जातं तर स्मार्टवॉच चार्ज करताना स्मार्टफोन चार्ज करायला विसरतो. युजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता OnePlus एक अनोखी चार्जिंग केबल घेऊन आला आहे.
OnePlus ने पुन्हा एकदा एक अनोखी चार्जिंग केबल लाँच करत त्यांच्या इनोव्हेटिव डिव्हाईसचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कंपनीने आता ग्राहकांच्या फायद्यासाठी एक नवीन चार्जिंग केबल लाँच केली आहे, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांचा स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच एकाच वेळी चार्ज करू शकणार आहेत. खरं तर OnePlus त्याच्या इनोवेशनसाठी खूप लोकप्रिय आहे. यूजर्सच्या सोयीसाठी, कंपनी त्यांच्या डिव्हाईसमध्ये नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये घेऊन येत असते. आता असंच एक नवीन इनोव्हेशन कंपनीने केलं आहे. कंपनीने 2-in-1 SUPERVOOC केबल लाँच केली आहे, ज्याच्या मदतीने युजर्स स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच एकाच वेळी चार्ज करू शकणार आहेत. याची किंमत 29.99 डॉलर म्हणजेच सुमारे 2574 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
So @oneplus (@OnePlus_USA) is doing a nice thing for their customers:
Launching a new 2-in-1 SUPERVOOC Cable that can charge your phone and OP Watch with one cable!
Sure your phone charges at 67W & watch at 10 but still!! It’s handy! And bag friendly! pic.twitter.com/7RLHyRaLRZ
— Matt (@Matt_Lavergne) July 15, 2025
वनप्लसच्या या केबलची लांबी 120 सेंटी मीटर आहे, जेव्हा केवळ फोन चार्ज होत असेल तेव्हा ही केबल 80W पर्यंत SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जेव्हा तुम्ही या केबलच्या मदतीने फोन आणि स्मार्टवॉच असे दोन्ही डिव्हाईस चार्ज करत असाल तेव्हा 67W फोन आणि 10W ची पावर स्मार्टवॉचला देते. ही केबल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, फोन आणि स्मार्टवॉच दोन्ही एकाच वेळी जलद गतीने चार्ज करू शकते.
कंपनीने या केबलच्या एका टोकाला USB-A कनेक्टर दिला आहे. यासोबतच, दुसऱ्या टोकाला दोन आउटपुट सोर्स दिले आहेत, ज्यामध्ये USB-C प्लग आणि मॅग्नेटिक POGO पिन कनेक्टर यांचा समावेश आहे, जे विशेषतः OnePlus चे स्मार्टवॉच चार्ज करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मॅग्नेटिक कनेक्टरच्या मदतीने पिन वॉचच्या चार्जिंग पिनने अगदी सहजपणे कनेक्ट केली जाऊ शकते. या केबलचा फायदा असा होईल की यूजर्सना फोन आणि स्मार्टवॉचसाठी वेगळे चार्जिंग केबल्स ठेवण्याची आवश्यकता नाही.
OnePlus ने असं सांगितलं आहे की, या चार्जिंग केबलमध्ये ई-मार्कर स्मार्ट चिप बसवण्यात आली आहे, जी ओव्हरलोडिंगपासून संरक्षण आणि स्टेबल पावर डिलीवरी सुनिश्चित करते. कंपनीने या चार्जिंग केबलमध्ये तांब्याच्या तारेचा वापर केला आहे, जो वेग आणि सुरक्षितता प्रदान करतो. वनप्लसच्या इतर केबल्सप्रमाणे, त्याच्या कव्हरवर लाल रंगाचा कोटिंग आहे.