भारतीय कंपनीने सादर केला AI स्मार्ट ग्लास! Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि अनोख्या फीचर्सनी सुसज्ज
इंडियन डीप-टेक स्टार्टअप Question What’s Real (QWR) ने एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-पावर्ड स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. हे स्मार्ट ग्लासेस Humbl या नावाने लाँच केले आहेत. स्टार्टअप कंपनीने असा दावा केला आहे की, Humbl भारताचे पहिले AI स्मार्ट ग्लासेस आहेत. या डिव्हाईसमध्ये Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये AI असिस्टेंट आहे, जो व्हिडीओ रिकॉर्ड करू शकतो, याशिवाय कन्वर्सेशनची समरी देखील देऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
एक प्रेस रिलीजमध्ये, डीप-टेक स्टार्टअपने त्यांचे लेटेस्ट प्रोडक्ट सादर केले आहे आणि सांगितलं आहे की, Humbl चा फोकस यूटिलिटी, डिस्क्रिशन आणि कंटेक्सचुअल अवेयरनेसवर आहे. कंपनीने या नवीन डिव्हाईसबाबत जास्त माहिती शेअर केली नाही, मात्र या नवीन डिव्हईसच्या फीचर्स आणि लूकचा विचार केला तर हे डिव्हाईस Ray-Ban Meta सारखेच आहे.
Humbl चा वापर एका सामान्य सनग्लासेसप्रमाणे देखील केला जाऊ शकतो. मात्र जेव्हा यामध्ये असणाऱ्या AI असिस्टेंट ‘Hey Humbl’ वेक फ्रेज अॅक्टिव्हेट केले जाते, तेव्हा हे डिव्हाईस एक असामान्य ग्लासेस बनते. AI असिस्टेंट ‘Hey Humbl’ वेक फ्रेज अॅक्टिव्हेट झाल्यानंतर व्हॉईस कमांड्सद्वारे पॉइंट-ऑफ-व्यू वीडियोज रेकॉर्ड करू शकते. हे मीटिंग्स आणि संभाषणांचा सारांश देऊ शकते, रिमाइंडर्स सेट करू शकते, एखाद्या ठिकाणाचे डायरेक्शन्स देऊ शकते आणि पूर्णपणे हँड्सफ्री आणि व्हॉइस इनपुटसह म्यूझिक प्ले करू शकते. याशिवाय, एआय असिस्टंट रिअल-टाइम ट्रांसलेशन्स देखील प्रदान करू शकतो.
कंपनीने हाइलाइट केला आहे की, स्मार्ट ग्लासेसचा AI असिस्टेंट ऑडियो आणि व्हिडीओ चॅनल्सकडून डेटा कलेक्ट आणि प्रोसेस करू शकतात. डिव्हाईसमध्ये कॅमरे आहेत, जे त्याला विजुअल फीड प्रदान करतात, ज्यामुळे ते आइटम्स आणि लँडमार्क्स ओळखू शकते आणि यूजरला त्यांच्या गंतव्यस्थानावर मार्गदर्शन करण्यासाठी वळणे सुचवते.
हालांकि, QWR ने हार्डवेयर स्पेसिफिकेशन्स किंवा AI असिस्टेंटच्या लार्ज लँग्वेज मॉडल (LLM) बाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. याशिवाय हे डिव्हाईस या महिन्याच्या शेवटी लाँच होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु स्टार्टअपने सांगितले की 2025 च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत या डिव्हाईसची शिपिंग सुरू होणार नाही. आतापर्यंत, स्टार्टअपच्या वेबसाइटवर या डिव्हाईसचा कोणताही उल्लेख नाही, जरी त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर काही प्रमोशनल व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ट
QWR ची स्थापना 2017 मध्ये सूरज अय्यर यांनी केली होती आणि ते ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR), व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (XR) या क्षेत्रात काम करते. या स्टार्टअपने ऑरल नावाचे दोन वेगवेगळे VR हेडसेट आणि स्मार्ट ग्लासेस तयार केले आहेत.