फोटो सौजन्य - pinterest
तुम्ही OnePlus युजर असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus ने त्यांच्या काही निवडक फोनवर एक खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफर अतंर्गत निवडण्यात आलेल्या फोनमध्ये ग्रीन लाईटची समस्या असल्यास कंपनी त्या फोनची स्क्रीन मोफत बदलून देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून OnePlus युजर्सच्या फोनमध्ये ग्रीन स्क्रीनची समस्या निर्माण होत आहे. सुमारे 50 ते 60 टक्के युजर्सना या ग्रीन स्क्रीनच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.
हेदेखील वाचा- OnePlus Nord 4 vs OnePlus Nord 3: Nord 4 की Nord 3 कोणता फोन देईल पैसै वसूल फीचर्स?
कंपनीने युजर्सची ही समस्या गांभीर्याने घेतली आहे. फोनमधील ग्रीन स्क्रीनची समस्या सोडवण्यासाठी कंपनीने एक ऑफर सुरु केली आहे. या ऑफरअंतर्गत काही निवडक फोनची स्क्रीन कंपनी मोफत बदलून देणार आहे. OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R स्मार्टफोनमध्ये ग्रीन स्क्रीनची समस्या आढळली आहे. त्यामुळे आता कंपनीने या फोनच्या डिस्प्लेवर लाइफटाइम वारंटी ऑफर केली आहे. ही नवीन ऑफर OnePlus Red Cable Club Royalty Program मध्ये दिसली आहे. या ऑफर अंतर्गत, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R स्मार्टफोन युजर्स मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करू शकतात. यासोबतच त्यांना मोफत स्वच्छता आणि देखभाल सेवाही मिळणार आहे.
हेदेखील वाचा- ‘ही’ कंपनी भारतात लाँच करणार स्मार्टफोन! OnePlus आणि Xiaomi ला देणार टक्कर
मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करणाऱ्या युजर्ससाठी कंपनीने काही अटी घातल्या आहेत. मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करणाऱ्या युजर्सचा फोन खराब झालेला असेल तर ते ह्या ऑफरचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच त्यांचा फोन कोणत्याही थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटरमध्ये उघडलेला असू नये. तुम्ही कंपनीच्या या अटी पूर्ण करत असाल, तरच मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करू शकता. यासाठी तुम्ही कंपनीला संपर्क करून मोफत स्क्रीन बदलण्याच्या ऑफरबाबत माहिती घेऊ शकता. कंपनी या प्रोग्राम अंतर्गत प्रगत डिस्प्ले पॅनेल ऑफर करत आहे. नवीन स्क्रीन चांगली कामगिरी, वाइब्रेंट कलर आणि मजबूत असेल.
हे डिस्प्ले उच्च आर्द्रता आणि उच्च तापमान असलेल्या ठिकाणी काम करण्यासाठी डिझाइन केले आहेत. ग्रीन स्क्रीनच्या समस्येपासून लोकांची सुटका करण्यासाठी मोफत स्क्रीन बदलण्याची ऑफर सुरू करण्यात आली आहे. जर तुमचा फोन आधीच खराब झाला असेल किंवा तुम्ही थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटरमध्ये तो दुरुस्त करून घेतला असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही ऑफर फक्त OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R या फोनसाठीच उपलब्ध आहे. OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R स्मार्टफोन युजर्स मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करू शकतात. यासोबतच त्यांना मोफत स्वच्छता आणि देखभाल सेवाही मिळणार आहे. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे.