फोटो सौजन्य - OnePlus
लोकप्रिय टेक कंपनी OnePlus लवकरच OnePlus Open ची स्पेशल एडीशन OnePlus Open Apex Edition लाँच करणार आहे. 7 ऑगस्ट रोजी भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात OnePlus Open Apex Edition लाँच केली जाणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. नवीन एडिशन एका खास रंगात लाँच केलं जाणार आहे. हा बदल केवळ रंगाच्या बाबतीत नसून रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत देखील अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. OnePlus Open चे स्पेशल एडिशन नवीन Crimson Shadow कलरमध्ये लाँच केले जाणार आहे.
हेदेखील वाचा- डॉक्टर रुग्णापासून 5000 किमी दूर; रोबोटच्या मदतीने केलं रुग्णाचं ऑपरेशन
OnePlus Open भारतात ऑक्टोबर 2023 मध्ये 16GB RAM + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला होता. OnePlus Open Apex Edition गेल्या वर्षी लाँच केलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे अपग्रेड वर्जन असू शकते. Apex Edition मध्ये अनेक नवीन गोष्टी उपलब्ध होतील, ज्यामुळे हा फोन खास होईल.
हेदेखील वाचा- सी-एज टेक्नॉलॉजीजवर सायबर अटॅक; 300 हून अधिक बँकांना फटका; UPI-ATM सेवा ठप्प
OnePlus ने X वर शेअर केलेल्या टीझरनुसार, OnePlus Open Apex Edition Crimson Shadow रंगात लाँच केला जाणार आहे. नावानुसार हा एक वीगन लेदर स्टाइलनधील क्रिमसन शेड असू शकते. कंपनीने सांगतिलं आहे की, Crimson Shadow रंग त्यांच्या सिग्नेचर ‘नेवर सेटल’ रेड रंगापासून प्रेरित आहे. OnePlus Open Apex Edition हा Emerald Dusk आणि Voyager Black मध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो. OnePlus Open Apex Edition नंतर कंपनी OnePlus Open 2 देखील लांँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. OnePlus Open 2 स्मार्टफोन 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus Open Apex Edition मध्ये OnePlus Open चे अनेक फीचर्स समाविष्ट असू शकतात. OnePlus Hasselblad 503CW 60 Years Victor Red Edition च्या सम्नानार्थ Apex Edition लाँच केलं जात आहे. फोनमध्ये नेहमीचे हॅसलब्लॅड ट्यूनिंग आणि ट्रीट असेल जे तुम्हाला नियमित OnePlus open मध्ये देखील पाहायला मिळतील. Apex Edition एक वेगळ्या डिझाईनमध्ये लाँच केलं जाऊ शकतं. Apex Edition मध्ये “प्रीमियम व्हेगन लेदर” फिनिश असेल.Apex Edition मध्ये AI इमेज एडिटिंग फीचर्स आणि नाविन्यपूर्ण सिक्युरिटी फीचर्स मिळतील. Apex Edition फोन 3 वर्षांच्या OS अपग्रेडसह ऑफर केला जाऊ शकतो. OnePlus Open 4 वर्षांच्या OS अपग्रेड ऑफर्स लाँच करण्यात आला आहे.
OnePlus Open Apex Edition मध्ये चे फीचर्स अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाहीत. मात्र OnePlus Open Apex Edition मध्ये OnePlus Open चे अनेक फीचर्स समाविष्ट असू शकतात. Apex Edition एक वेगळ्या डिझाईनमध्ये लाँच केलं जाऊ शकतं. Apex Edition मध्ये “प्रीमियम व्हेगन लेदर” फिनिश असेल.