फोटो सौजन्य - pinterest
टेक्नोलॉजी सर्विस प्रोवाइडर सी-एज टेक्नॉलॉजीज (C-Edge Technologies) वर सायबर अटॅक झाल्याचं समोर आलंं आहे. सी-एज टेक्नॉलॉजीज हा SBI आणि TCS चा संयुक्त उपक्रम आहे. याचा परिणाम देशभरातील छोट्या बँकांवर झाला आहे. सी-एज टेक्नॉलॉजीजवर झालेल्या सायबर अटॅकचा फटका देशभरातील 300 हून अधिक छोट्या बँकाना बसला आहे. सायबर अटॅकमुळे 300 छोट्या बँकांची आणि वित्तीय संस्थांची बँकांशी संबंधित काम ठप्प झाली आहेत. तसेच UPI-ATM सेवेवर देखील याचा परिणाम झाला आहे.
हेदेखील वाचा- जबरदस्त डिस्काउंट आणि भन्नाट ऑफर्ससह Flipkart चा बिग बजेट डेज सेल सुरु!
बँकांना सायबर अटॅकचा फटका बसल्याने UPI-ATM सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नागरिकांना ATM मधून पैसे काढता येत नाहीत. तर UPI व्दारे पेमेंट करण्यात किंवा पैसे ट्रान्सफर करण्यात देखील अनेक अडचणी येत आहेत. याबाबत सायबर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमनुसार, सी-एज टेक्नॉलॉजीजवर झालेल्या हल्ल्याचा सहकारी बँका आणि ग्रामीण प्रादेशिक बँकांच्या ग्राहकांवर परिणाम झाला आहे. कारण ह्या बँका SBI आणि TCS चा संयुक्त उपक्रम असलेल्या सी-एज टेक्नॉलॉजीजवर अवलंबून आहेत. सी-एज टेक्नॉलॉजीजवर अवलंबून असणाऱ्या देशभरातील 300 हून अधिक बँकांवर या सायबर अटॅकचा परिणाम झाला असून त्यांची कामं ठप्प झाली आहेत.
हेदेखील वाचा- Apple ने रोलआउट केलं सर्वात मोठं iOS अपडेट! Apple इंटेलिजेंससह अनेक फीचर्सचा समावेश
मात्र इतर बँकांची कामं सुरळित सुरु आहेत. सी-एज टेक्नॉलॉजीज गेल्या दोन दिवसांपासून अनेक विविध समस्यांचा सामना करत होती. त्यानंतर आता सी-एज टेक्नॉलॉजीजवर सायबर अटॅक झाल्याचं समोर आलं आहे. सी-एज टेक्नॉलॉजीजच्या सिस्टमला हॅकिंगची सूचना देण्यात आली होती, असं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सी-एज टेक्नॉलॉजीजवर झालेल्या अटॅकमुळे मोठ्या पेमेंटच्या सुरक्षेसाठी सी-एजला तात्पुरते डिस्कनेक्ट करावे लागले आहे. यासोबतच आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली आहे.
इंडियन नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियनचे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी सांगितलं की, गुजरातच्या 17 जिल्हा सहकारी बँकांसह देशभरातील सुमारे 300 बँका गेल्या दोन-तीन दिवसांपासून अडचणीत आहेत. 29 जुलैपासून बँकांना अडचणी येत असून सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी याला तांत्रिक बिघाड म्हणत आहेत. सायबर अटॅकमुळे आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. हा हल्ला रॅन्समवेअर हल्ल्यामुळे झाला असावा. याचा परिणाम बँकिंग नेटवर्कशी जोडलेल्या अनेक यंत्रणांवर झाला आहे. रॅन्समवेअर हा मालवेअरचा एक प्रकार आहे, जो तुमच्या संगणकात प्रवेश करतो आणि अॅक्सेस मिळवतो. हे तुमच्या सर्व फाईल्स एन्क्रिप्ट करते. तसेच डेटा परत देण्याच्या बदल्यात खंडणीची मागणी करतो.
मे 2017 मध्ये, WannaCry ransomware ने जगभरातील डझनभर देशांवर हल्ला केला. यामध्ये 2 लाखांहून अधिक यंत्रणावर याचा परिणाम झाला होता. यामध्ये भारताचाही सहभाग होता. हॅकर्सनी संगणक प्रणाली लॉक करून 300 ते 600 डॉलर्स गोळा करण्यास सांगितलं होतं. या हल्ल्यात अमेरिकन आरोग्य यंत्रणेवर सर्वाधिक प्रभावित झाला होता. यानंतर, 2019 मध्ये, 29 एप्रिल रोजी, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश स्टेट पॉवर युटिलिटीवर रॅन्समवेअर हल्ला झाला होता. यानंतर हॅकर्सनी सिस्टमचा पूर्ण ताबा घेतला आणि बिटकॉईनच्या माध्यमातून खंडणीची मागणी केली. मात्र, नंतर यंत्रणा पूर्ववत करण्यात आली.