तुमच्या OnePlus डेव्हिसमध्ये ग्रीन लाईन येतेय? आता चिंता मिटली, कंपनीने घेतला मोठा निर्णय
OnePlus Green Line Issue: गेल्या अनेक महिन्यांपासून वनप्लस युजर्सना त्यांच्या वनप्लसच्या मॉडेल्सच्या डिस्प्लेमध्ये ग्रीन लाइनच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युजर्स प्रचंड हैराण झाले असून त्यांनी याबाबत अनेकदा कंपनीकडे तक्रार देखील केली आहे. युजर्सच्या या समस्यांवर आता कंपनीने एक निर्णय घेतला असून वनप्लस युजर्सना दिलासा देण्याचं ठरवलं आहे. आघाडीच्या टेक कंपनी वनप्लसने स्मार्टफोन्सच्या ग्रीन लाईन समस्येयाबाबत मोठे विधान केले आहे.
हेदेखील वाचा- सॅमसंगचा स्पेशल एडीशन स्मार्टफोन लाँच, जबरदस्त कॅमेरा आणि डिझाईनही नवं
अनेक OnePlus 8 आणि OnePlus 9 सिरीज स्मार्टफोन्सवर डिस्प्ले समस्या येत आहेत, ज्याबद्दल वापरकर्ते सतत मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर तक्रार करत आहेत. भारतातील अनेक वापरकर्त्यांनी या समस्येबाबत तक्रार केली आहे. यापूर्वी OnePlus 8, OnePlus 9 आणि OnePlus 10 सीरीज स्मार्टफोन्समध्ये मदरबोर्ड समस्या होत्या. मात्र, आता कंपनीने ग्रीन लाईनची समस्या लक्षात घेऊन एक मोठा निर्णय घेतला आहे. वनप्लस कंपनीने युजर्सना आजीवन डिस्प्ले वॉरंटी देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचा युजर्सना मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून OnePlus 8 आणि OnePlus 9 सीरीज स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये ग्रीन लाइनची समस्या आहे. फोनचे सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर डिस्प्लेमध्ये एक पातळ ग्रीन लाईन दिसू लागते. मात्र, केवळ वनप्लसच नाही तर याआधी सॅमसंग, मोटोरोला आणि विवोच्या फोनमध्येही अशीच समस्या दिसली होती. या संदर्भात कंपनीने म्हटले आहे की, या समस्येवर मात करण्यासाठी सप्लाय चेनमध्ये बदल करण्याची गरज आहे.
हेदेखील वाचा- आता इंटरनेटशिवाय करा गुगल मॅपचा वापर, तुमचं काम होईल अधिक सोपं! केवळ या स्टेप्स फॉलो करा
युजर्सच्या या समस्येवर कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे आणि ज्या यूजर्सला अशा समस्या येत आहेत त्यांनी जवळच्या सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी असे कंपनीने म्हटले आहे. ज्या युजर्सना ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यांच्या फोनचा डिस्प्ले विनामूल्य बदलला जाईल. या परिस्थितीत, वापरकर्ते त्यांचे डिव्हाइस अपग्रेड करू शकतात किंवा डिस्प्ले बदलू शकतात. मोठी गोष्ट म्हणजे फोनची वॉरंटी संपली तरी स्क्रीन बदलली जाणार आहे.
वनप्लस 8 आणि वनप्लस 9 सीरीजच्या निवडक मॉडेल्समध्ये अशा प्रकारची समस्या येत आहे. यापूर्वी, मदरबोर्डच्या समस्यांबाबत, कंपनीने वापरकर्त्यांना जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क साधण्यास सांगितले होते. कंपनी मदरबोर्ड दुरुस्तीच्या खर्चात काही कपात करेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, कंपनीच्या या निर्णयावर यूजर्स खूश दिसत नाहीत. मात्र आजीवन डिस्प्ले वॉरंटी देण्याचा कंपनीचा निर्णय युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे.