सॅमसंगचा स्पेशल एडीशन स्मार्टफोन लाँच, जबरदस्त कॅमेरा आणि डिझाईनही नवं
टेक कंपनी सॅमसंगने त्यांचा स्पेशल एडीशन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Samsung Galaxy Z Fold 6 स्पेशल एडिशन स्मार्टफोन होम मार्केटमध्ये लाँच केला आहे. अनेक बदलांसह आणि नवीन लूकसह हा फोन स्पेशल एडिशन बाजारात लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या फोनचा डिस्प्ले आकार मूळ Galaxy Z Fold 6 पेक्षाही मोठा आहे.
हेदेखील वाचा- आता इंटरनेटशिवाय करा गुगल मॅपचा वापर, तुमचं काम होईल अधिक सोपं! केवळ या स्टेप्स फॉलो करा
दक्षिण कोरियाच्या आघाडीच्या टेक कंपनीने जागतिक बाजारपेठेत Samsung Galaxy Z Fold 6 स्पेशल एडिशन लाँच केले आहे. सॅमसंगचा हा फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 6 पेक्षा पातळ आणि हलका आहे. यासोबतच कंपनीने दावा केला आहे की त्याच्या काही वैशिष्ट्यांसह कॅमेरा सिस्टम आणि डिस्प्लेमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा नवा फोन एका नवीन आणि स्टायलिश लूकसह लाँच करण्यात आला आहे. सध्या कंपनीने या फोल्डेबल स्मार्टफोनची स्पेशल एडिशन केवळ दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy Z Fold 6 स्पेशल एडिशन दक्षिण कोरियामध्ये 2,789,600 KRW म्हणजेच सुमारे 1,70,000 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा फोन सध्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह एकाच प्रकारात ऑफर केला जात आहे. यासोबतच हा फोन ब्लॅक शॅडो कलर ऑप्शनसह बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.
दक्षिण कोरियामध्ये या फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. T Direct Shop, KT, Eu+ सारख्या ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मसह कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन ऑर्डर केला जाऊ शकता. या फोनसह, खरेदीदारांना Galaxy Ring, Galaxy Watch Ultra, Galaxy Buds 3 Pro आणि Galaxy Tab S10 Ultra सारख्या सॅमसंगच्या इतर डिव्हाईसच्या खरेदीवर डिस्काऊंट मिळणार आहे.
हेदेखील वाचा- सॅमसंग घेऊन येतोय AI फीचर्ससह नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, कधी होणार लाँच? वाचा सविस्तर
Samsung Galaxy Z Fold 6 Special Editions मध्ये मूळ फोनपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 8-इंचाचा इंटरनल आणि 6.5-इंचाचा आउटर डिस्प्ले आहे. Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा आउटर आणि 7.60-इंचाचा इंटरनल डिस्प्ले होता. आस्पेक्ट रेशो बद्दल बोलायचे झाले तर, आउटर डिस्प्ले 21:9 आहे आणि इंटरनल डिस्प्ले 20:18 आहे.
सॅमसंगचे स्पेशल एडिशन मॉडेल उत्तम एर्गोनॉमिक्ससह लाँच करण्यात आले आहे. सॅमसंगने दावा केला आहे की Samsung Galaxy Z Fold 6 Special Editions मूळ Galaxy Z Fold 6 पेक्षा 1.5mm पातळ आणि 3g हलके आहे. नवीन फोन 10.6mm जाडी आणि 236 ग्रॅम वजनाचा आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 200 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअपच्या दुसऱ्या कॅमेरा लेन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
Samsung Galaxy Z Fold 6 Special Edition मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे, सोबत 16GB RAM आणि 512GB स्टोरेज आहे. यासोबतच सॅमसंगचा हा फोन Galaxy AI सपोर्टसह येईल. म्हणजेच यूजर्सना फोनमध्ये सॅमसंगच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा सपोर्ट मिळेल.